जेव्हा प्रदोष व्रत सोमवारच्या दिवशी येते त्याला सोम प्रदोष व्रत म्हटले जाते. प्रत्येक महिन्यातील त्रयोदशीला प्रदोष व्रत केले जाते. यंदाचे प्रदोष व्रत सोमवारी येत असल्यामुळे त्याला सोम प्रदोष व्रत म्हटले जाते. एका महिन्यामध्ये दोन प्रदोष व्रत असतात, पहिले कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरं शुक्ल पक्षात आहे. यावेळी माघ महिन्याचा कृष्ण पक्ष सुरू आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी संघ्याकाळी शंकराची पूजा केली जाते. महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होण्यास मदत होते. महादेवाची पूजा नियमित केल्यास तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते.
सोमवारचा दिवस महादेवाला समर्पित आहे. सोमवारी महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामधील सर्व संकट दूर होतात त्यासोबतच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. महादेवाला देवांचे देव म्हटले जाते. आता अनेकांना प्रश्न पडतो की यंदाचा सोम प्रदोष व्रत नेमकं कधी आहे? आणि सोम प्रदोष व्रताला महादेवाची पूजा कशी आणि कोणत्या शुभ मुहूर्तावर होणार?
हिंदू पंचांगानुसा, 2025मध्ये माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी रविवार, 26 जानेवारी रोजी रात्री 8.54 वाजता सुरू होणार ते सोमवार 27 जानेवारी रात्री 8.34 रोजी संपणार. प्रदोष कालावर आधारित 27 जानेवारीच्या दिवशी सोम प्रदोष व्रत केले जाणार. सोमवार 27 जानेवारीला सोम प्रदोष व्रताची पूजा करण्यासाठी तुम्हाला अडीच तासांपेक्षा जास्त वेळ मिळणार आहे. सोम व्रताच्या संध्याकाळी 5.56 ते 8.34 या काळामध्ये पूजा करू शकता. हा वेळ सोम प्रदोष व्रताचे शुभ मुहूर्त आहे. सोम प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी 05:26 ते 06:19 पर्यंत म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावर देखील शुभ मुहूर्त मानला जातो. त्या दिवसाचा शुभ मुहूर्त म्हणजेच अभिजीत मुहूर्त दुपारी 12.13 ते 12.55 पर्यंत असणार आहे. सोम प्रदोष व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी वाढते. त्यासोबतच तुमच्या कुंडलीतील चंद्र दोष कमी होण्यास मदत होते. महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये संपत्ती येण्यास मदत होते.
प्रदोष व्रताच्या दिवशी ‘या’ मंत्रांचा जप
ओम पार्वतीपतये नमः।
।। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात ।। शम्भवाय च मयोभवाय च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च।। ईशानः सर्वविध्यानामीश्वरः सर्वभूतानां ब्रम्हाधिपतिमहिर्बम्हणोधपतिर्बम्हा शिवो मे अस्तु सदाशिवोम ।।