ए.आय तंत्रज्ञानाद्वारे 'पंढरीच्या वारी'वर नियंत्रण ठेवले जाणार

2 hours ago 2

ए.आय. तंत्रज्ञानाद्वारे 'पंढरीच्या वारी'वर नियंत्रण ठेवले जाणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Published on

20 Jan 2025, 4:24 pm

Updated on

20 Jan 2025, 4:24 pm

पंढरपूर : पंढरपूरमध्ये आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री या चार मोठ्या यात्रांना भाविकांची मोठी गर्दी असते. दरवर्षी सव्वा कोटींपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात येतात. त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी मंदिर परिसर, प्रदक्षणा मार्ग आणि चंद्रभागेचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो. या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आता ए.आय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून राज्य सरकारला दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव दाखल करण्यात आला.

दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षाकाठी एक कोटी भाविक येत असतात. आषाढी यात्राकाळात मानांच्या पालख्यांसह अनेक दिंड्या पायी पंढरपूरला येत असतात. दशमी आणि एकादशी दिवशी मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग आणि चंद्रभागा वाळवंटामध्ये लाखो भाविकांची गर्दी असते. यात्रा काळात भाविकांना सुरक्षित आणि सुलभ दर्शन मिळावे, कुठेही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने महिनाभर अगोदरच तयारी केली जाते. प्रत्येक वर्षी होणाऱ्या सोहळ्यात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता ए. आय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या माध्यमातून सुरक्षित गर्दी व्यवस्थापन ही संकल्पना राबवली जाणार आहे. यासाठी चालणारी गर्दी, बसलेली गर्दी आणि उभे राहिलेली गर्दी याचे योग्य नियोजन केले जाणार आहे. यात्रा काळामध्ये वेगवेगळ्या विभागामार्फत गर्दीचे व्यवस्थापन केले जाते. त्या विभागांना ए.आय. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकत्रित आणले जाणार आहे.

ए .आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकत्रीकरण...

ए.आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व विभागांचे एकत्रिकरण करण्यात येणार आहे. यामध्ये सॅटॅलाइट, इंटरनेट, जीपीएस सिस्टीम व्हिडिओ शूटिंग, सीसीटीव्ही आणि मानवी व्यवस्थापन हे सर्व एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकत्र केले जाणार आहे.

ए.आय तंत्रज्ञान तयार करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून शासनाकडे दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण आराखडा तयार केला जाणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवणारे विभाग यंत्रणांच्या माध्यमातून एकत्रित आणले जाणार आहेत.याचा पुढील शेकडो वर्ष यात्रा व्यवस्थापनासाठी फायदा होणार आहे.

शक्तीसागर ढोले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article