Students uniform: विद्यार्थ्यांना गणवेश कधी वाटप करणार?

2 hours ago 1

शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचा प्रशासनाला सवाल!

बुलढाणा (Students uniform) : देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासन विविध योजना राबवते. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गणवेश सुद्धा दिले जातात. मात्र यंदा ऑक्टोंबर सुरू झालेला असलातरी गणवेश विद्यार्थ्यांना वाटप झालेले नाही. यावर्षीची गणवेश (Students uniform) हे पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना देणारा आहात का ? असा सवाल शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत (Jalindar Budhwat) यांनी प्रशासनाला विचारला आहे.

जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनापूर्विच गणवेश वाटप करण्यात येतो. परंतु या वर्षी अजूनही जि. प. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश (Students uniform) वाटप करण्यात आलेला नाही. प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत (Jalindar Budhwat) यांनी बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला आहे.

३० सप्टेंबर रोजी जालिंदर बुधवत (Jalindar Budhwat) यांनी शिवसेना पदाधिकारी यांच्यासमवेत बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी तालुकाप्रमुख लखन गाडेकर, किसन तालुकाप्रमुख अशोक गव्हाणे, युवासेना तालुका प्रमुख संजय शिंदे, युवासेना शहर प्रमुख सचिन परांडे, एकनाथ कोरडे, मोहम्मद सोफियान, अनिकेत गवळी, राहुल जाधव, अनिल राणा, किशोर कानडजे, सागर हिवाळे, यासीन तान्हा, विकास निर्मळे, शेख फिरोज यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article