बदलापूर लैंगिक अत्याचार | संस्थाचालक, सचिवाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

2 hours ago 1

दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून बदलापूर बंदची हाक file photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

01 Oct 2024, 11:27 am

Updated on

01 Oct 2024, 11:27 am

पुढारी ऑनलाईन डेस्क : बदलापूर येथील एका शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी उच्च न्यायालयाने मंगळवारी संस्थाचालक आणि सचिवाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. संस्थाचालक आणि सचिवाने यापूर्वी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, तेथून हा अर्ज फेटाळल्यानंतर दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

या संदर्भात बार अँड बेंच या वेबसाईटने एक्स पोस्ट केलेली आहे.

Suo Moto खटल्यात सुनावणी २३ ऑक्टोबरला

दरम्यान याच प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात Suo Moto खटला सुरू आहे. या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांना फैलावर घेतले. संस्थाचालक आणि सचिव या दोघांना अजून अटक का झालेली नाही, असा सवाल न्यायमूर्तींनी केला. राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ म्हणाले, "या प्रकरणात दोन आरोपपत्र दाखल आहेत. संस्थाचालकांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटालळा असून त्यांनी यावर उच्च न्यायालयात अपील केलेले आहे."

सराफ यांच्या या माहितीवर न्यायमूर्तींनी ताशेरे ओढले. "या दोन लोकांना अजून अटक का केलेली नाही. तुम्ही यांना अटकपूर्व जामीन मिळण्याची वाट पाहात आहात का?" असा सवाल न्यायमूर्तींनी केला. तसेच या सुनावणी वेळी विशेष तपास पथकाचे प्रमुख उपस्थिती नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी पुढील सुनावणी आता २३ ऑक्टोबरला होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article