दोन महिन्यांत 1 लाख ग्राहक वाढले:देशातील 26,400 दुर्गम, नो नेटवर्क गावांमध्ये बीएसएनल 4 जी इंटनेट सेवा देणार

2 hours ago 1
केंद्र सरकारच्या मदतीने देशातील २६ हजार ४०० नो नेटवर्क मधील अतिदुर्गम, नक्षली प्रक्षेत्र, डोंगर दऱ्यातील गावांमध्ये भारत संचार निगम ४ जी इंटरनेट सेवा प्रदान करणार आहे. त्याचे काम १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यापैकी महाराष्ट्रात २२०० गावे असून छत्रपती संभाजीनगर १६ पैकी १५, जालना १९ पैकी ८ आणि बुलडाणा ४४ गावांमध्ये प्रत्यक्ष ४ जी इंटरनेट सेवा सुरू झाली आहे. परिणामी जुलै व ऑगस्ट महिन्यात प्रथमच १ लाख ग्राहकांची संख्या वाढली आहे, अशी माहिती महाव्यवस्थापक संजयकुमार केशरवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. केशरवानी पुढे म्हणाले की, १ ऑक्टोबर रोजी बीएसएनएलला २४ वर्ष पूर्ण झाले आहेत. आजही पूर्ण ताकदीने ग्राहकांना सेवा प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. १६ विविध खासगी कंपन्या आल्या होत्या. त्यातील १२ कंपन्या बंद पडल्या आहेत. बँका, एटीएम, स्मार्ट सिटी आदींना बीएसएनएल मार्फतच इंटरनेट सेवा पुरवली जाते. आता आम्हाला सरकारने नो नेटवर्क भागांमध्ये इंटरनेट सेवा सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ गावे अशी होती तिथे कोणत्याच कंपनीची इंटरनेट सेवा पोहोचलेली नाही. त्यापैकी १५ गावांत आता बीएसएनएलची ४ जी सेवा कार्यान्वित झाली आहे. ग्राहक संख्येत १५ पटीने वाढ गतवर्षी छत्रपती संभाजीनगरात ५० हजार ग्राहक वाढले होते. यंदा जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यातच १ लाख ग्राहक वाढले आहेत. ग्राहकांना अपेक्षित इंटरनेट सेवा आता आम्ही सुरू केली आहे. खासगी कंपन्यांच्या तुलनेत रिचार्ज दर कमी आहेत. त्यामुळे ग्राहक पसंती देऊ लागले आहेत. देशात ३.५० लाख ग्राहक होते ते आता ५२ लाख ५० हजारांवर जाऊन पोहोचले आहेत. परिणामी सीम संपले आहेत. त्यात आम्ही आता वाढ करतोय असे केशरवानी म्हणाले. टॉवरची स्थिती जिल्ह्यात ३०४ फोर जी टॉवर उभे केले आहेत. तर एकूण ९४४ टॉवर आहेत. खासगी कंपनीच्या १२० टॉवरसोबत शेअरिंग करार केला आहे. तर बीएसएनएलच्या ४० टॉवरवरून खासगी कंपन्यांना सेवा दिली जात असल्याचेही केशरवानी यांनी यावेळी नमुद केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article