हवाई सुंदरीच्या धर्तीवर एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये दिसणार ‘शिवनेरी सुंदरी’

2 hours ago 1

हवाई सुंदरीच्या धर्तीवर एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये दिसणार 'शिवनेरी सुंदरी'

विमानात जशी हवाई सुंदरी अगदी त्याच धर्तीवर आता एसटी महामंडळाच्या ई-शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ असणार आहे. शिवसेना नेते भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी याबाबतच्या पहिल्या निर्णयाची घोषणा केली आहे. “मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिवारिक (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल, अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे”, अशी माहिती एसटी महामंडाळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या ३०४ व्या बैठकीमध्ये दिली.

एसटी महामंडळाचे नये अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली ३०४ वी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्यांच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली.

आनंद आरोग्य केंद्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे स्मरणार्थ एसटीबा ३४३ बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र” या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. अत्यंत माफक दरान बस स्थानकांवरील प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या आणि औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांना बस स्थानकांवरील ४००ते ५०० चौ.सेमी.ची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तेथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पैथोलॉजी, लॅब, औषध दुकान सुरू करून सेवा द्यावयाची आहे.

मूल आणि धारणी येथे नये आगार निर्माण होणार

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशामध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार आहे. या आगाराच्या निर्मितीनगर एसटीच्या एकूण आगाराची संख्या ३ होणार आहे.

pic.twitter.com/RPVjBi4ZY2

— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) October 1, 2024

प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा

एसटी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन १०x१० आकाराचा स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उपरोक्त निर्णयाबरोबरच नवीन २५०० साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरु करणे, डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रुपांतर करणे अशा विविध विषयांना या बैठकीत मान्यता देण्यात आली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article