समाज पाठिशी भक्कमपणे उभा असल्याचा दिला विश्वास
देशोन्नती वृत्तसंकलन
बल्लारपूर (Sudhir Mungantiwar) : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि प्रत्येक (Ballarpur Assembly Elections) बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप- महायुतीचे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना गोलकर उभे समाज संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेचे सचिव महेश मॅकलवार, उपाध्यक्ष किरण चेनमेवार, संघटक प्रवीण भिमनवार, सदस्य कोमलवार, निलेश यांचे मेकलवार, विलास दंडीकवार यांनी ना. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना समर्थन पत्र देऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
ना. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना विविध संघटनांकडून मोठे समर्थन मिळत आहे. (Golkar Samaj Sangathan) गोलकर समाज संघटनेच्या अडचणीमध्ये मुनगंटीवार यांनी पाठिशी भक्कमपणे राहून साथ दिली. गोलकर समाजभवनाकरीता शासनाकडून निधी खेचून आणला, यासाठी समाज बांधवांनी सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) पत्रातून आभार मानले आहेत. पुढेही समाजाला असेच सहकार्य मिळावे व समाजाचा विकास व्हावा यासाठी समर्थन देण्यात येत असल्याचे संघटनेने पत्रात नमूद केले आहे.
पत्रामध्ये गोलकर समाज संघटनेने सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) याचा उल्लेख विकासपुरूष असा केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात (Ballarpur Assembly Elections) बल्लारपूरप्रमाणे विकासाची गंगा आणणारे दुसरे कोणीही लोकप्रतिनिधी होऊच शकत नाही. एखाद्या लोकप्रतिनीधीला ५० वर्षांत जो विकास साधणे शक्य होणार नाही, त्यापेक्षाही कितीतरी अधिक विकासकामे ना. मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या कार्यकाळात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात अवघ्या काही वर्षांमध्ये झाली आहेत, असा गौरवोल्लेख देखील संघटनेद्वारे करण्यात आला.
या विकासकामांसाठी गोलकर समाज नेहमी आपल्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिला असून भविष्यात देखील अशीच साथ देईल, असा विश्वास सुद्धा समाजाद्वारे व्यक्त करण्यात आला. (Ballarpur Assembly Elections) बल्लारपूर मतदारसंघाच्या विकासासाठी परत एकदा, भरघोस मतांनी विजयी होऊन विधानमंडळामध्ये मोठ्या थाटात प्रवेश करावा, अशा शुभेच्छा देखील गोलकर समाज बांधवांनी सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना दिल्या आहेत.