अधिकारी कर्मचार्यांनी आपले मतदानाचा कर्तव्य बजावले Pudhari News Network
Published on
:
16 Nov 2024, 6:53 am
Updated on
:
16 Nov 2024, 6:53 am
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत विधानसभा मतदारसंघांत मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी-कर्मचार्यांसह पोलिसांच्या टपाली मतदानास गुरूवारपासून (दि.14) प्रारंभ झाला. यावेळी अधिकारी कर्मचार्यांनी आपले कर्तव्य बजावत असताना आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.व सामान्य नागरिकांनाही आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी व कर्मचार्यांच्या टपाली मतदान प्रक्रियेस डोंबिवलीतील सिस्टर निवेदिता हायस्कूलमध्ये दुसर्या प्रशिक्षणाच्या वेळी प्रारंभ करण्यात आला.बुधवारी टपाली मतदान करु न शकलेल्या उर्वरित अधिकारी व कर्मचार्यांना 17, 18 व 19 नोव्हेंबर रोजी टपाली मतदानाद्वारे आपले मत डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात असलेल्या सुविधा केंद्रात (ऋउ) नोंदविता येणार आहे. तसेच 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान अत्यावश्यक सेवेतील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा सावित्रीबाई फुले कलामंदिरातील टपाली मतदान केंद्रात उपलब्ध आहे.
टपाली मतदान प्रक्रियेत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर, तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रध्दा चव्हाण, संजय भोये आणि निवडणूक नायब तहसीलदार सुरेश महाला यांनी टपाली मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजाविला. तसेच पोलीसांनी बंदोबस्ताचे वेळापत्रक सांभाळत मतदान केले.
गुरूवारी (दि.14) सायंकाळी निवडणूक कर्तव्यावरील 172 अधिकारी व कर्मचार्यांनी आपला टपाली मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजाविला. टपाली मतदान केंद्रात अत्यावश्यक सेवेतील 224 अधिकारी व कर्मचार्यांनी टपाली मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे. बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार्या सार्वत्रिक विधानसभा मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी आवर्जून मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी केले.