Washim: १९ वर्षीय बिहारी कामगाराची आत्महत्या

2 hours ago 2

कारंजा (Washim) :- टायर पंक्चर दुरुस्तीच्या दुकानातील १९ वर्षीय बिहारी कामगाराने गळफास घेवून आत्महत्या (Suicide)केल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. मो. सहादत मो.साबीर, रा. मथुरापुर ता. पुरुषोत्तमपूर जि. मुजफ्फरपुर (बिहार) असे मृतकाचे नाव आहे.

कापडी शेल्याने दुकानातील आतल्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या

मो. सहादत मो.साबीर हा स्थानिक सावरकर चौकातील निसार अली मेहबूब अली (५०, रा.काझी प्लॉट कारंजा) यांच्या मालकीच्या मस्तान नामक टायर पंक्चर दुरुस्तीच्या दुकानात काम करायचा व तेथेच राहायचा. त्याने दुकानात कुणीही हजर नसताना स्वतः जवळच्या कापडी शेल्याने दुकानातील आतल्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचा बराच प्रसंग दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, घटना निदर्शनास येताच तातडीने त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. पण येथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कारंजा शहर पोलीस उपजिल्हा रुग्णालय येथे पोहोचले व पुढील सोपस्कार पूर्ण केले. घटनेची माहिती मृतकाच्या कुटुंबीयास देण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार मिश्रा, पोहेकॉ मोहम्मद परसुवाले करीत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article