'अ‍ॅन अनपॅलेटेबल ट्रूथ' पुस्तकाचे प्रकाशन:छंदाचे रूपांतर ध्यासात व्हावे - डॉ. श्रीकांत केळकर

5 days ago 4
डॉ.मेहरा श्रीखंडे लिखित 'अ‍ॅन अनपॅलेटेबल ट्रूथ' या इंग्रजी पुस्तकाचे आणि 'एक न पटणारे सत्य ' या मराठी अनुवादाचे प्रकाशन पुण्यात झाले. 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थल्मोलॉजी' चे संस्थापक डॉ. श्रीकांत केळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणा केळकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले .या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद अशोक शिंदे यांनी केला आहे. डॉ.श्रीकांत केळकर म्हणाले,पुण्याला आकाश निरीक्षणापासून अवकाश संशोधनापर्यंत मोठी परंपरा आहे.आकाश पाहणे हा अनेकांचा छंद असला तरी त्या पलीकडे आकाशातील रहस्य समजून घेणे सोपे नाही. छंदाचे रूपांतर ध्यासात झाल्याशिवाय अशी निर्मिती होऊ शकत नाही.हा अवघड विषय असून त्यावर प्रकाश टाकणारे हे पुस्तक संग्राह्य आहे. मेहेरा श्रीखंडे यांनी लेखनामागील प्रेरणा सांगितल्या.त्या म्हणाल्या,' आपल्या जगाच्या पलीकडे काय आहे याबद्दल कुतूहल 'एक न पटणारे सत्य' पुस्तकातून पुढे येते.बरम्युडा ट्रांगल, समुद्रखालील भूकंप, यूएफओ,सॉसर,परग्रहीय गूढ घटनांचा आणि अज्ञात क्षेत्रांचा शोध घेण्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.रॉसवेलच्या गूढ घटना ते प्राचीन इजिप्तचे रहस्य, हे पुस्तक आकर्षक कथा आणि तपशीलवार संशोधनांनी भरलेले आहे, ज्यामुळे सर्व ज्ञात गोष्टींवर प्रश्न निर्माण होतात. अनुभवी यूएफओ प्रेमी किंवा फक्त अज्ञाताबद्दल उत्सुक असणाऱ्या वाचकांचा दृष्टिकोन हे पुस्तक बदलेल.कल्पनाशक्ती प्रज्वलित करेल,असा विश्वास लेखिका डॉ.मेहरा श्रीखंडे यांनी व्यक्त केला. अशोक शिंदे म्हणाले,अंतराळविश्वाची भ्रमंती हा विषय मराठीत फारसा हाताळला जात नाही. शास्त्रीय विषय सामान्य वाचकांना समजेल असे लिहिले गेले पाहिजेत. परग्रहावरील जीवसृष्टी बद्दल कुतूहल शमले पाहिजे.पृथ्वीवरील अनेक स्थापत्य रचनामागील प्रगत तंत्रज्ञानाचा शोध लागलेला नाही.पुढील पिढी कदाचित ही रहस्ये उलगडून दाखवेल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article