Satara Crime News | घटनास्थळी पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, परिसरातील ऊस तोड सुरू आहे.Pudhari Photo
Published on
:
20 Jan 2025, 3:53 am
Updated on
:
20 Jan 2025, 3:53 am
विडणी : विडणी येथील एका उसाच्या शेतात अंधश्रद्धेतून झालेल्या महिलेच्या निघृण खुनाचा तपास अद्यापही सुरूच आहे. नैवेद्य म्हणून खून झालेल्या महिलेच्या मृतदेहाचे तुकडे चार बाजूला फेकले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. महिलेचे धड अद्याप सापडले नसून, याचा कसून तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलिस ठाण मांडून असून तपासासाठी विविध पथके रवाना झाली आहेत.
विडणी, ता. फलटण येथील पंचवीस फाटानजीक प्रविण जाधव यांच्या उसाच्या शेतात शुक्रवारी एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. भानामतीच्या प्रकारातून हा खून झाल्याचा पोलिसांचा कयास आहे. घटनास्थळावर हळदी-कुंकू, गुलाल, साडी, काळी बाहुली, दहीभात व लिंबू यासह अन्य वस्तू आढळून आल्या. हा खून इतका निघृणपणे करण्यात आला आहे की त्या महिलेची कवटी घटनास्थळापासून ५०० मीटर अंतरावर आढळून आली तर कमरेखालचा भाग दुसऱ्या ठिकाणी सडलेल्या अवस्थेत सापडला असून शरिराचा मानेपासून कमरेपर्यंतचा भाग (धड) अद्यापही सापडला नाही. त्याचा कसून तपास सुरू आहे.
१६ एकरातील ऊस तोडण्याचे काम सुरू
संपूर्ण पोलिस यंत्रेणेसह जिल्हा पोलिसप्रमुख समीर शेख स्वतः घटनास्थळी ठाम मांडून आहेत. त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून पोलिसांची विविध पथके संशयितांच्या शोधार्थ अनेक ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान तपास कामात अडथळा येत असलेल्या घटनास्थळ परिसरातील १६ एकरातील ऊस ऊसतोड कामगारांकडून तोडण्यात येत आहे.