अक्कलकोटमध्ये 396 मतदान केंद्रांवर अधिकारी पोहोचले:मतदारसंघात 15 आदर्श मतदान केंद्र, 2376 केंद्रावर होणार मतदान

1 day ago 1
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी एकूण ३९६ मतदान केंद्रांवर सर्व साहित्य, मतदान यंत्रे पोहोच झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत बनसोडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनायक मगर यांनी दिली. ३९६ पैकी बोरोटी खु. व शासकीय मुलींचे वसतिगृह हन्नूर रोड, अक्कलकोट हे दोन बुथ महिला मतदान केंद्र असून, त्याठिकाणी सर्व कर्मचारी महिला असणार आहेत. दिव्यांग मतदान केंद्र डी. एड. कॉलेज अक्कलकोट व जेऊर असे दोन ठिकाणी आहेत. अक्कलकोट विधानसभेसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी, ०३ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ४५ क्षेत्रीय अधिकारी व २३७६ मतदान केंद्रावरील कर्मचारी आहेत. ६०० पोलिस, होमगार्ड नेमले असून मतदान यंत्र व कर्मचारी ने-आण करण्यासाठी ६३ बसेस, ६ जीपची मदत घेण्यात आली. सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहायक, महसूल सहायक व पोलिस पाटील निवडणूक कामी कार्यरत आहेत. एकूण १५ आदर्श मतदान केंद्र आहेत. श्री शहाजी हायस्कूल नवीन इमारत खोली क्रमांक पाच व चार, शारदा माता इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा खोली क्रमांक ३ अक्कलकोट, उच्च प्राथमिक शाळा, एवन चौक खोली क्र. १ अक्कलकोट, श्री काशिराय काका डी. एड. कॉलेज रूम नंबर २, मैंदर्गी उर्दू हायस्कूल पूर्व बाजूची खोली क्रमांक १ व तीन असे एकूण पाच, दुधनी असे आदर्श मतदान केंद्र असून दुधनी युवा आदर्श मतदान केंद्र एक आहे. तसेच कुंभारी येथे युवा मॉडेल मतदान केंद्र व महिला मतदान केंद्र आहे. अक्कलकोट येथे महिला मतदान केंद्र व बोरोटी बु., शिवचलेश्वर हायस्कूलमैंदर्गी, मातोश्री म्हेत्रे प्रशाला दुधनी शांतलिंगेश्वर इंग्लिश मॉडेल स्कूल दुधनी, कुंभारी उर्दू शाळा कुंभारी खोली क्र. २, समाजकल्याण सोलापूर मागास व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे वसतिगृह, हन्नूर रोड अक्कलकोट यांचा समावेश आहे. मतदान शांततेत होण्यासाठी ४१२ पोलिस कर्मचारी, ३७३ होमगार्ड, शंभर पोलिस अधिकारी, सीआरपीएफ एक बटालियन असा तगडा पोलिस बंदोबस्त आहे. तदानासाठी यंत्र घेऊन केंद्रावर जाणारे अधिकारी.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article