अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी स्थानिकांचा विरोध:दहन नव्हे तर दफनविधी करण्याची पालकांची इच्छा, नेमके कारण काय?

2 hours ago 1
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. यानंतर अक्षयच्या मृतदेहावर बदलापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मात्र, बदलापूरमधील स्मशानभूमीत अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता अक्षयचा मृतदेहाचे दहन केले जाणार नसून पुरण्यात येणार आहे. दहनविधी नव्हे तर दफनविधी करणार अक्षय शिंदे वडिलांचे वकील अमित कटारनवरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. अमित कटारनवरे म्हणाले, पुरावे नष्ट होऊ नये म्हणून मृतदेह पुरणार आहे. भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल. परंतु मृतदेह पुरण्यासाठी देखील जागा मिळत नाही. आमच्या मुलाला न्याय मिळवून द्यायचा आहे, अशी कुटुंबाची भावना आहे. त्यासाठी कुटुंबाचा हा प्रयत्न आहे की, अक्षयचा मृतदेह शक्य तितका जतन करून ठेवू म्हणून आम्ही दहन करणार नसून पुरणार आहोत. दरम्यान, अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी जागा मिळत नसल्याची तक्रार अक्षयच्या कुटुंबीयांनी कोर्टात केली आहे. यानंतर सरकारी वकिलांनी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. पालिका प्रशासनाशी बोलून अक्षय शिंदेच्या अंत्यविधीसाठी आम्ही जागा अक्षयच्या कुटुंबियांच्या इच्छेप्रमाणे उपलब्ध करून देऊ, असे सरकारी वकिलांमार्फत कोर्टात आश्वासन देण्यात आले आहे. अक्षयवर अंत्यसंस्काराला स्थानिक नागरिकांनी विरोध पोलिसांनी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केल्यानंतर राज्यात या प्रकरणावरून वेगवेगळे तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. विरोधकांनी देखील पोलिसांवर तसेच सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचे काहींनी समर्थन केले आहे तर काहींनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. अशा परिस्थितीत बदलापूर येथे स्मशानभूमीत अक्षयवर अंत्यसंस्कार करायला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत अक्षय शिंदेचे अंत्यसंस्कार मांजर्ली स्मशानभूमीत होऊ देणार नाही, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article