Teli Samaj Melava: अमरावतीत २९ रोजी तेली समाज राज्यस्तरीय परिचय मेळावा

2 hours ago 1

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर ,आ. अभिजीत वंजारी, किशोर कन्हेरे,खा. बळवंत वानखडे ,माजी खा. सुरेश वाघमारे यांची राहणार प्रमुख उपस्थिती
श्री संताजी समाज विकास संस्थेचे आयोजन

अमरावती (Teli Samaj Melava) : तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रम राबवित समाजपयोगी कार्यात अग्रेसर असलेल्या श्री संताजी समाज विकास संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांचा एक भाग म्हणून येत्या 29 सप्टेंबर रोजी अमरावतीत सर्व शाखीय (Teli Samaj Melava) तेली समाजातील उपवर- वधू व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पंचवटी चौक स्थित पीडीएमसीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल सभागृहात आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन रविवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राज्याचे माजी मंत्री व (Teli Samaj Melava) तेली समाजाचे राष्ट्रीय नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते होणार आहे. श्री संताजी समाज विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय आसोले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या राज्यस्तरीय मेळाव्यास नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी ,अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर कन्हेरे ,माजी खासदार सुरेश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सोबतच माजी आमदार राजू तिमांडे ,माजी महापौर विलास इंगोले, माजी खासदार अनंत गुढे ,सतीश देऊळकर नागपूर, माजी महापौर अशोक डोंगरे , दामोदरराव मोगरकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या मेळाव्यात तेली समाजाचे भूषण ,प्रसिद्ध साहित्यिक दिल्ली येथील लक्ष्मणराव शिरभाते चहावाले यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय परिचय मेळाव्यास राज्यातील वर्धा , नागपूर , चंद्रपूर , यवतमाळ, मेहकर ,भंडारा, मुंबई, पुणे ,कोल्हापूर, जळगाव , नाशिक याबरोबरच मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यातील तेली समाज बांधव सहभागी होणार असून या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय आसोले , उपाध्यक्ष मिलिंद शिरभाते, नंदकिशोर शिरभाते , कोषाध्यक्ष प्रा.डॉ. अनुप शिरभाते, सचिव प्रा. सुनील जयसिंगपूरे व कार्यकारणी सदस्य प्रा. डॉ. प्रकाश पजगाडे , डॉ. विजय अजमिरे , आशिष आगरकर, विलास शिरभाते हे परिश्रम घेत आहे. सदर मेळाव्यास (Teli Samaj Melava) तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संताजी समाज विकास संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

विवाहबंधन विशेषांकाचे होणार विमोचन

तेली समाज (Teli Samaj Melava) राज्यस्तरीय उपवर वधू व पालक परिचय मेळाव्याचे निमित्ताने सर्व उपवर- वधू यांची सचित्र माहिती असलेला विवाहबंधन हा विशेषांक प्रकाशित करण्यात येणार आहे. मेळाव्यात या विशेषांकाचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून यावर्षी या विशेष अंकांमध्ये तब्बल 800 विवाहयोग्य मुला मुलींची सचित्र माहिती असल्याचे प्राध्यापक संजय आसोले यांनी सांगितले.

संस्थेने जपले सामाजिक दायित्व: प्रा. आसोले

आजच्या धावपळीच्या जीवनात लग्नही समस्या अधिक बिकट होत चालली असून उपवर -वधू संशोधन करणे ही जिकरीची बाब झाली आहे. समाज बांधवांना भेडसावणारी ही समस्या लक्षात घेता श्री संताजी समाज विकास संस्थेने नेहमीप्रमाणे आपले सामाजिक दायित्व जपत यावर्षी देखील पुढाकार घेत तेली समाज राज्यस्तरीय उपवर वधू व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. गेल्या 14 वर्षापासून संस्था सातत्याने परिचय मेळाव्याचे आयोजन करीत असून या (Teli Samaj Melava) मेळाव्याच्या माध्यमातून उपवर वधू संशोधन करणाऱ्या पालकांना एकाच ठिकाणी अनेक स्थळांची माहिती मिळत असल्यामुळे त्यांची मोठ्या त्रासातून सुटका झाली आहे. परिणामी या मेळाव्याच्या आयोजनातून शेकडो विवाह जुळल्याचा दावा प्रा संजय आसोले यांनी करीत तेली समाज बांधवांना मोठा दिलासा मिळाल्याचे म्हटले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article