Women suicide case: महिला आत्महत्या प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल

2 hours ago 1

देवठाणा येथील घटना

मानोरा (Women termination case) :  पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देवठाणा येथील विवाहित महिला मेघा अनिल राठोड (Women termination case) आत्महत्या प्रकरणी २५ सप्टेंबर ला मानोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. तिघांविरुद्ध विविध कलम नुसार गुन्हे दाखल करून (Manora Police) पोलिसांनी प्रकरण तपासात घेतले आहे.

पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती नुसार देवठाणा येथील विवाहित महिला मेघा अनिल राठोड हिला माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये नाही तर वडिलांच्या नावे असलेली पाच एकर शेती पैकी दोन एकर शेती नावाने करून दे म्हणून तीला मानसिक शारीरिक त्रास दिला सासरच्या त्रासाला कंटाळून (Women termination case) विवाहित महिला मेघा राठोड यांनी विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. असी फिर्याद मृतक महिला हिच्या वडिल भावराव हंजारी चव्हाण यांनी २५ सप्टेंबर ला मानोरा पोलीस स्टेशनला दिली. आरोपी पती अनिल उल्हास राठोड, सासरा उल्हास वसराम राठोड सासू ललिता उल्हास राठोड यांचे विरुद्ध कलम १०८, ३(5) सह कलम हुंडा प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा दाखल करून, घटनेचा तपास (Manora Police) पोलीस उपनिरीक्षक बाबाराव पवार हे करीत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article