मोटार वाहन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप:दोन दिवसांत परिवहन विभागाचा एक अब्ज रुपयांचा महसूल बुडाला

2 hours ago 1
राज्य मोटार वाहन विभागातील सोळाशे कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. दोन दिवसांत सुमारे १ अब्ज रुपयांचे महसूल बुडाला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन विभागातील सर्व ६६ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात सहभाग घेतला. तर १ कोटी २० लाख रुपयांचा महसूल बुडला आहे. तसेच वाहन चालकांचे परवाना नूतनीकरणासह सर्व कार्यालयीन कामकाज पूर्णपणे बंद राहील्याने त्यांची प्रचंड गैरसोय झाली. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना सचिव सुरेंद्र सरतापे यांनी निवेदनाद्वारे सरकारला कळवले आहे की, आरटीओचे लिपिक कर्मचारी १०० टक्के संपावर गेल्यामुळे दररोज ५० कोटींचे नुकसान होत आहे. याकडे सरकारने गांभीर्याने बघावे व कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडून बेमुदत संप मिटवण्यासाठी पुढाकार घ्यावा. कर्मचारी अब्जो रुपयांचा महसूल जमा करून देतात. त्यामुळे शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. तरी देखील सरकार अडमुठे धोरण अवलंबित असल्याने बेमुदत संप चालू ठेवावे लागत आहे. दोन वर्षांपासून अंलमबजावणी नाही आकृतीबंध मंजूर होऊन २ वर्षांचा कालावधी उलटला आहे. तरी अद्याप प्रशानामार्फत अंमलबजावणी केलेली नाही. ज्येष्ठता गमावून महसूल विभागनिहाय स्तरावर बदल्या करण्यात आल्या आहेत. हा अन्याय आहे. १६ ऑगस्ट २०२४ च्या कर्मचारी समायोजन आदेशाबाबत संघटनेने सादर केलेल्या पत्रानुसार पुनर्विचार करण्यात यावा. आकृतीबंधानुसार तात्काळ पदोन्नती द्यावी. जाचक अटी रद्द कराव्यात. समायोजन रद्द करावे. कळसकर समितीची सुधारीत अंमलबजावणी व्हावी. आदी प्रमुख मागण्यांसाठी राज्य मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article