मुंबईत उद्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
Published on
:
25 Sep 2024, 5:19 pm
Updated on
:
25 Sep 2024, 5:19 pm
मुंबई : हवामान विभागाने मुंबई महानगराला गुरूवारी (दि.२६) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या गुरूवारी (दि.२६) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.