पुणे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर Pudhari File Photo
Published on
:
25 Sep 2024, 6:18 pm
Updated on
:
25 Sep 2024, 6:18 pm
पुणे : जिल्ह्यामध्ये कोसळणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा व महाविद्यालयांना गुरुवारी (दि.26) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना सुट्टी जाहीर केली आहे.