महामेट्रोच्या विविध कामाच्या शुभारंभासाठी PM मोदी पुण्यात:पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त वाहतूक बदल

2 hours ago 1
महामेट्रोच्या विविध कामाच्या शुभारंभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी दि. २६ पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने काही ठिकाणचे रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी पुण्यात तीन ठिकाणी भेट देणार आहेत. त्याअनुषंगाने वाहतुकीमध्ये बदल केला आहे. सावरकर पुतळा चौक ते सारसबाग, पुरम चौक दरम्यान सर्व वाहनांना प्रवेश बंद केला आहे. वाहन चालकांनी सिंहगड रोडवरुन सावरकर चौक उजवीकडे वळण घेऊन मित्रमंडळ चौक ते व्होल्गा चौक मार्गे इच्छित स्थळी जावे. तर मित्रमंडळ चौक कडुन सावरकर चौक डावीकडे वळण घेवुन सिंहगड रोड जक्शंन वरुन इच्छित स्थळी मार्गस्थ व्हावे. जेधे चौक ते सातारा रोड वाहनांसाठी प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे टिळक रोड व शिवाजी रोडवरील वाहनांनी जेधे चौक मधुन डावीकडे वळण घेवुन सेवन लव्हज चौक उजवीकडे वळण घ्यावे. वखार महामंडळ उजवीकडे वळण घेवुन मार्केट यार्ड जक्शंन वरुन सातारा रोडला जावे. तसेच लव्हज चौक ते जेधे चौक प्रवेश बंद ठेवला आहे.वाहन चालकांनी लव्हज चौक डावीकडे वळण घेवुन वखार महामंडळ उजवीकडे वळुन सातारा रोड वरुन इच्छित स्थळी जावे. व्होल्गा चौक ते जेधे चौक प्रवेश बंद ठेवला जाणार आहे. त्यानुसार व्होल्गा चौक डावीकडे वळण घेवुन सावरकर चौक मार्गे इच्छितस्थळी जावे. सातारा रोडवरील वाहने मार्केट यार्ड जक्शंन येथुन उजवीकडे वळण घेवुन वखार महामंडळ चौक डावीकडे वळण घेवुन लव्हज चौकामधुन इच्छित स्थळी जातील. कामगार पुतळा ते शिवाजी चौक दरम्यान दोन्ही बाजुने प्रवेश बंद ( रानडे पथ ) ठेवण्यात येणार आहे. वाहन चालकांनी कामगार पुतळा ते शाहीर अमर शेख चौक मार्गे, शिवाजी चौक सरळ मंगला सिनेमा समोरुन काँग्रेस हाऊस रोडवरुन जावे. तोफखाना चौक ते कोर्टाकडे प्रवेश बंद ठेवला असून वाहन चालकांनी तोफखाना चौक डावीकडे वळण घेऊन जावे. ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक प्रवेश बंद ठेवला असून, ना.सी.फडके चौक डावीकडे वळण घेवुन निलायम ब्रिज खालुन सिंहगड रोड वरुन इच्छित स्थळी जावे. बाबुराव घुले पथ पथावरुन टिळक कॉलेज चे पुढे आंबील ओढा जंक्शन कडे प्रवेश बंद असून, टिळक कॉलेज चौकामधुन उजवीकडे वळन घेवुन जॉगर्स पार्क रोड वरुन शास्त्री रोडवर येवुन इच्छितस्थळी जावे. सानेगुरुजी पथ - टिळक रोड जंक्शन जे निलायम ब्रिज पर्यंत सर्व प्रकारचा वाहनांसाठी नो पार्कींग केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article