Illegal liquor Ban: बाक्टी चान्ना गावातील अवैद्य दारू विक्री बंदची मागणी

2 hours ago 1

शेकडो महिला ,पुरुष यांच्यासह अवैध दारू विक्रेत्यांची उपस्थिती

अर्जुनी मोर (Illegal liquor Ban) : अर्जुनी मोरगांव पोलीस स्टेशन अंतर्गत बाक्टी,चान्ना गावामध्ये 100 वर्षापासून सर्रासपणे मोह फुलाची दारू विक्री (Illegal liquor Ban) केली जाते . येथील अवैध मोहफुलाची दारू परिसरात,तालुक्यात व शेजारील तालुक्याबरोबर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. येथील दारू पिण्यासाठी परिसरातील तालुक्यातील व तालुक्यात बाहेरील व्यसनाधीत मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे याचा परिणाम नवीन पिढीवर होत आहे.

येथील हातभट्टीची दारू विक्री बंद करण्याचा प्रयत्न पोलिसांनी अनेकदा केला. परंतु येथील अवैध दारू विक्री बंद झाली नाही. मात्र अर्जुनी मोर, चे पोलीस निरीक्षक कम्लेश सोनटक्के यांच्या सहकार्याने परिसरात दारूबंदी होत आहे. यामध्ये त्यांनी दिनांक 25/09/2024ला ग्रामपंचायत पटांगणात बाक्टी येथे बैठक घेऊन (Illegal liquor Ban) अवैध दारू विक्रेत्यांना तसेच दारू पिणाऱ्या व्यसनाधीशांना सूचना देऊन यापुढे या गावात कुणी दारू विक्री करू नये आणि दारू पिणाऱ्यावर व अवैध मोह फुलाची दारू काढून विक्री करनारावर कायदेशीर कारवाई करून तडीपार करण्यात येईल, असे ठणकावून सांगितले.

यावेळी गावातील युवा पिढी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. दारूचा व्यवसाय करून लोकांना त्रास दिलाअशा सर्वांनी दारूबंदी करिता एकत्र आले पाहिजे, असे अर्जुनी मोरचे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी ठणकावून सांगितले, (Illegal liquor Ban) दारूबंदी चा देण्यात आली. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत पदाधिकारी सर्व गावातील नागरिक उपस्थित होते. पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी अवैध दारू विक्री (Illegal liquor Ban) त्यांना व्यासणाधीशांना व गावकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून गावातील दारूबंदी करणे सहकार्य करावा असे आवाहन केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article