आपल्या किडनीची योग्य देशभाल कशी कराल? एक्सपर्ट डॉ. राहुल गुप्ता काय सांगतात?

2 hours ago 1

भारतात किडनीचा आजार आणि मूत्रपिंडाशी संबंधित समस्या वेगाने वाढत आहे. जीवनशैली, पर्यावरण आणि आहारांमुळे हा आजार होत आहेत. रक्त फिल्टर करणे, कचरा काढून टाकणे, इलेक्ट्रोलाइट्स संतुलित करणे आणि रक्तदाब नियंत्रित करणे यासाठी मूत्रपिंड महत्त्वाचे आहेत. त्यामुळे भारतात किडनीच्या वाढत्या आजाराला नियंत्रित करण्यासाठी आणि मूत्रपिंडासंबंधातील देखभालीत सुधारणा करण्यासाठी किडनीच्या आरोग्याला प्रभावीत करणाऱ्या कारणांना समजून घेतलं पाहिजे.

अति धूम्रपान किडनीच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि रक्त वाहिन्यांना नुकसान होतं. त्यामुळे क्रोनिक किडनी रोग (CKD) होतो. परिणामी किडनीच्या कार्याला बाधा येते. धूम्रपानाच्या धोक्याची वाढती जागरुकतेनंतरही त्याचे प्रचलन, विशेषत: तरूण आणि निम्न सामाजिक आर्थिक समूहांच्यामध्ये चिंताजनक झाली आहे.

खराब अन्न किडनासाठी हानीकारक

अन्नपदार्थांची गुणवत्ता हा एक महत्त्वाचा चिंतेचा विषय आहे. भारतात जड धातू, कीटकनाशक आणि अन्य हानिकारक पदार्थांमुळे जेवण विषाक्त होतं. त्यामुळे किडनीला त्याचा गंभीर धोका निर्माण होतो. कृषीवरील रसायनाचा मारा आणि अन्नपदार्थांच्या साठवणुकीच्या खराब पद्धतीमुळे विषाक्त पदार्थांचा आहारात समावेश अधिक होतो. त्याच्यामुळे किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे ज्यात सोडियम आणि प्रिझर्वेटिव्हची मात्रा असते अशा अधिक अतिरिक्त प्रक्रिया न केलेले, पॅकेज्ड पदार्थांमुळे हायपरटेन्शन आणि मधुमेहाचा धोका वाढतो. किडनीच्या आजाराचं ते प्रमुख कारण असतं.

हवा प्रदूषण सुद्धा किडनीचं आरोग्य बिघडवतात. भारतात हवेत कण असतात. प्रदूषणाचा स्तर अत्यंत उच्च असतो. त्यामुळे किडनी अधिक खराब होऊ शकते. ही एक पर्यावरणीय समस्या आहे. गतिहिन जीवनशैली आणि खराब आहारामुळे किडनीशी संबंधित समस्यांचा धोका अधिक वाढतो.

पाण्याची गुणवत्ताही तेवढीच महत्त्वाची आहे. भारतात अनेक भागात स्वच्छ पाणी अत्यंत मर्यादित मिळतं. दूषित जलस्त्रोत लोकांना हानिकारक पदार्थ आणि जलजन्य रोगांना बळी पाडतात. त्याचा किडनीवर अतिरिक्त परिणाम होतो. पाण्यातील प्रदूषक घटक आणि जड धातूंमुळे दीर्घकाळपर्यंत किडनीवर परिणाम होतो. किडनीत खडे आणि संक्रमण होण्याची शक्यता असते. किडनीची समस्या रोखण्यासाठी समग्र आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी सुरक्षित आणि स्वच्छ पाणी देणं महत्त्वाचं आहे.

भारतात किडनीची प्रकरणे का वाढली?

भारतात किडनीची प्रकरणे अधिक वाढली आहेत. परंपरागत आरोग्य सेवा, त्याच्यावर उपाययोजना करण्यात आलेलं अपयश, जागरुकतेचा अभाव यामुळे ही संख्या वाढली आहे. अनेक लोक तर नियमित आरोग्य तपासणी करतच नाहीत, पण किडनी फंक्शनची स्क्रीनिंगही करत नाहीत. तसेच जेव्हा उपचाराचे पर्याय अत्यंत कमी असतात त्यामुळे किडनीच्या रोगाचं निदान करण्यात उशीर झालेला असतो. किडनीचं आरोग्य, धूम्रपानाचा धोका तसेच स्वस्थ जीवनशैली आणि पर्यावरणाच्या लाभासाठी जागरुकता वाढवण्यासाटी सार्वजनिक आरोग्य आणि शैक्षणिक अभियान गतिमान करण्याची गरज आहे.

या आव्हानावर उपाय शोधण्यासाठी एका बहुआयामी दृष्टिकोणाची आवश्यकता आहे. सार्वजनिक आरोग्याबाबतच्या जनजागृतीची मोहीम आणि कठोर नियमांच्या माध्यमातून धूम्रपान कमी करण्याचं जनजागरण केल्यास किडनीच्या आरोग्यावर होणारा त्याचा नकारात्मक परिणाम दूर करता येईल. खाद्य सुरक्षा मानकं वाढवणे आणि खाण्यापिण्याच्या निरोगी प्रचलनाला प्रोत्साहन देण्यासाठी हानिकारक पदार्थांपासून दूर राहण्यास मदत मिळू शकते. उत्सर्जन नियंत्रण आणि स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांसह हवा प्रदूषण दूर करण्यासाठी किडनीवरील पर्यावरणीय तणाव दूर करण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे अतिरिक्त, स्वच्छ पेयजल मिळण्यासाठी परंपरागत ढाचा आणि शुद्धिकरण तंत्रात सुधारणा करणे महत्त्वाचे आहे.

जीवनशैलीत बदल हवाच

निष्कर्ष पाहिला तर, भारतात किडनी आजार आणि मूत्रपिंडाशी संबंधित समस्या धूम्रपान, विषारी अन्नपदार्थ, हवा प्रदूषण आणि पाण्याच्या गुणवत्तेचा अभाव आदी कारणाने वाढते. किडनीच्या आरोग्यात सुधारणा आणि किडनीच्या आजाराचा प्रसार कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्याची मोहीम आणि व्यक्तिगत जीवनशैलीत बदल करण्यासाठी एका व्यापक रणनीतीची गरज आहे. आरोग्यदायी वातावरण आणि व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. सामूहिक प्रयत्नांमुळे किडनीशी संबंधित समस्येला चांगला अटकाव आणि नियंत्रण करता येईल.

या विषयावर अधिक माहिती मिळवण्यासाठी TV9 डीजिटल दिल्ली- एनसीआरच्या सर्वोदय हॉस्पिटलमध्ये यूरोलॉजीचे ज्येष्ठ सल्लागार आणि रीनल ट्रान्स्प्लांटचे प्रमुख डॉ. राहुल गुप्ता यांच्या सोबत एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या चर्चेत किडनीच्या आरोग्याबाबतचं जागरण, किडनीच्या आजाराचं कारण आणि किडनी अधिक काळ टिकून राहण्यासाठी जीवनशैलीतील बदल, धोक्याची जाणीव वेळीच होण्यासाठीची सावधानता आणि उपलब्ध आरोग्य मदत आदी प्रमुख विषयांवर बोललं जाणार आहे. या सत्रासाठी TV9 नेटवर्कचे YouTube चॅनल पाहा. अधिक माहितीसाठी डॉ. गुप्ता यांची वेळ घेण्यासाठी सर्वोदय रुग्णालय, सेक्टर 8, फरीदाबाद येथे 1800 313 1414 वर संपर्क साधा.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article