अजित पवारांचे CM पदाचे स्वप्न पूर्ण होणार?:भाजप राज्यात धक्कातंत्र वापरण्याची शक्यता; मुख्यमंत्रीपदासाठी 3 फॉर्म्युल्यांवर गंभीर चर्चा

2 hours ago 1
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. पण निकालाला 3 दिवस लोटले तरी महायुतीला अद्याप आपल्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यात यश आले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावर धक्कातंत्र वापरण्याची शक्यता आहे. या प्रकरणी 3 फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू आहे. त्यात फडणवीस यांना तूर्त थांबण्याचे निर्देश दिले जातील. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निकालानंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्यामुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल असा दावा केला जात आहे. पण सत्ताधारी शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. या घडामोडींतच महायुतीने मुख्यमंत्रीपदासाठी 1-4 चा फॉर्म्युला पुढे आणल्याची माहिती आहे. या फॉर्म्युल्यानुसार एकनाथ शिंदे यांना पुढील 1 वर्षासाठी मुख्यमंत्रीपदी कायम ठेवले जाऊ शकते. त्यानंतरची 4 वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले जाऊ शकते. देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेचा प्रश्न यासंबंधीच्या वृत्तानुसार, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा राज्यात मराठा विरोधी नेता म्हणून तयार झाली आहे. ही प्रतिमा भविष्यात त्यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते. त्याचा फटका नववर्षाच्या प्रारंभी होणाऱ्या मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसू शकते. त्यामुळे या निवडणुका हातावेगळ्या होईपर्यंत शिंदे यांच्याकडे हे पद ठेवले जाऊ शकते. त्यानंतर फडणवीस राज्याची सूत्रे हाती घेऊ शकतात. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 2016 साली भाजपने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आता देखील त्यांच्या नेतृत्वात भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करेल. त्यात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी राहून चांगले योगदान देऊ शकतात, असेही यासंबंधी सांगितले जात आहे. अजित पवारांचे स्वप्न पूर्ण होणार? एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवारांचेही मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुतीत अन्य एका फॉर्म्युल्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यानुसार पहिले दोन वर्षे देवेंद्र फडणवीस, त्यानंतरची दोन वर्षे एकनाथ शिंदे व अखेरचे एक वर्ष अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदावर आरुढ होतील. याशिवाय फडणवीस व शिंदे यांना अडीच - अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यावरही चर्चा सुरू आहे. भाजप शिंदेंना केंद्रात महत्त्वाचे खाते देणार? देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले तर भाजप एकनाथ शिंदे यांच्याकडे किंवा त्याच्या पक्षाच्या एखाद्या नेत्याकडे केंद्रात महत्त्वाचे खाते सोपवू शकते. श्रीकांत शिंदे यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. या सर्व चर्चा आहेत. त्यावर अंतिम निर्णय अद्याप होणे बाकी आहे. दरम्यान, नव्या सरकारचा शपथविधी शनिवारी किंवा रविवारी होण्याची शक्यता आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article