अनुदानावरील 266 ची युरिया बॅगची उद्योगासाठी 2200 रुपयांमध्ये विक्री:परजिल्ह्यातून आलेल्या युरियाची सुरू होती रिपॅकींग; तीन जणांना अटक‎

4 days ago 3
शेतकऱ्यांना पिकासाठी आवश्यक असलेल्या युरियाच्या एका बॅगवर केंद्र सरकारकडून २ हजार रुपये अनुदान दिले जाते. मात्र हा अनुदानित युरिया शेतकऱ्यांनाच मिळतो. असे असले तरीही गुन्हे शाखा व कृषी विभागाच्या पथकाने शहरालगत असलेल्या वडगाव परिसरातील एका गिट्टी खदान परिसरात धाड टाकून अनुदानित युरियाचे पोते फोडून तो युरिया औद्योगिक वापरासाठी लिहिलेल्या बॅगमध्ये ‘रिपॅकींग’ सुरू असलेल्या ठियावर धाड टाकली. पोलिसांनी १५ लाखांच्या ६३० युरियाच्या बॅग जप्त केल्या आहेत. हा गोरखधंदा करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई कृषी विभाग व पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी (दि. १२) सकाळपर्यंत केली आहे. संजय रमेशचंद्र अग्रवाल (५४, रा. पुलगाव रोड, आर्वी), अशोक धनराज रावलानी (५४, रा. कृष्णानगर, अमरावती) आणि दिनेशकुमार छबराज यादव (४५, रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) यांना पोलिसांनी रंगेहात अटक केली. रमेश अग्रवालचा आर्वी येथे कृषी बी, बियाणे, खत विक्रीचा व्यवसाय आहे. अमरावतीच्या अशोक रावलानीचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय असून, तो संजय अग्रवालच्या परिचित आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तसेच बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव भागातून हा युरिया रावलानीच्या ट्रकमध्ये अमरावतीत आणला आहे. शुक्रवारी रात्री पोलिस व कृषी विभागाच्या पथकाने मिळालेल्या माहितीवरून वडगाव मार्गावरील एका गिट्टी खदान परिसरात धाड टाकली. त्यावेळी एका ट्रकमधील युरियाचे पोते खाली काढून { उर्वरित. पान ४ अटक केलेल्या तिघांविरुद्ध फसवणूक तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा यासह अन्य कलमान्वये नांदगाव पेठ पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची (दि. १४) पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. आरोपींनी ज्या बॅगमध्ये युरिया आणला होता, त्या बॅगवर ‘भारतीय जन उर्वरक परियोजना भारत युरिया’ असे नमूद होते. याचाच अर्थ हा अनुदानावर शेतकऱ्यांना मिळणारा युरिया होता. तो युरिया ज्या बॅगमध्ये ‘रिपॅक’ करत होते, त्या बॅगवर ‘टेक्निकल ग्रेड युरिया फॉर इंडस्ट्रीयल युज ओन्ली’ असे नमूद केले आहे. तर ट्रकमागे १० लाख रुपयांची होतेय कमाई आरोपी एकावेळी सुमारे ३० टन युरिया ठियावर आणत होते. अनुदानावर मिळणाऱ्या बॅगचे वजन ४५ किलो, तर औद्योगिक वापरासाठी असलेली बॅग ५० किलोची राहते. त्यामुळे आरोपी या ठिकाणी ५० किलोप्रमाणे बॅगचे पॅकिंग करत होते. विशेष म्हणजे हे सर्व काम रात्री करतात. यासाठी सहा मजूर कामावर ठेवले. आरोपींना एका ट्रकमागे १० ते १२ लाख रुपये नफा मिळत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article