आज लोकशाहीचा उत्सव:राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी मतदान, 4 हजार 136 उमेदवार रिंगणात

1 day ago 2
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अपक्षांसह विविध पक्षांच्या एकूण 4 हजार 136 उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये कैद होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर एकूण 158 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी 6 मोठे पक्ष दोन आघाड्यांचा भाग म्हणून निवडणूक लढवत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणात झालेली उलथापालथ पाहता यंदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील 1 लाख 186 मतदान केंद्रांवर 9 कोटी 59 लाख मतदार आपला मताधिकार बजावतील. यात 19.48 लाख फर्स्ट टाईम मतदार आहेत. राज्यात एकूण 9.59 कोटी मतदार आहेत. त्यात 4.59 कोटी पुरुष, तर 4.64 कोटी महिला मतदार आहेत. थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून दिव्यांग मतदारही 6.32 लाख एवढे आहेत. राज्यात 1.86 लाख मतदान केंद्र आहेत. त्यापैकी 52585 केंद्र शहरी भागात, तर 57,601 केंद्र ग्रामीण भागात आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 950 मतदार असतील. मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी राज्यभरात सकाळी 7 ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी असणार आहे. मतदारांनी या कालावधीत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही निवडणूक आयोगाने दिला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत लढत गेल्या महिनाभरापासून राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला असून सत्ता आपल्याकडेच राहावी यासाठी महायुती प्रयत्नशील आहे. तर लोकसभेच्या निकालानंतर आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीने सत्ता परत मिळवण्यासाठी कंबर कसल्याचे दिसून येते. महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांनी या निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. पण मतदार अखेरच्या क्षणी कुणाच्या पारड्यात आपले मतदान टाकतील, हे आज होणारे मतदान व त्यानंतर शनिवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. प्रदेशनिहाय जागा खालीलप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र - 70 जागा विदर्भ - 62 मराठवाडा - 46 कोकण ठाणे - 39 मुंबई - 36 उत्तर महाराष्ट्र - 35 महाराष्ट्रातील हॉट सीट्स 1. बारामती : राजकीय वारशाची लढाई, काका-पुतण्या आमनेसामने बारामती मतदारसंघ शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. 1967 ते 1990 पर्यंत सलग 6 वेळा ते या जागेवरून आमदार होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत येथे शरद पवारांनी अजित पवारांविरोधात युगेंद्र पवारांना रिंगणात उतरवले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ही पक्षाची पहिलीच निवडणूक आहे. 2. मानखुर्द-शिवाजीनगर : महायुतीचे दोन उमेदवार आमनेसामने मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवारच आमनेसामने असणार आहेत. शिवसेनेकडून सुरेश पाटील यांनी तिकीट देण्यात आले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध होता. मात्र, अजित पवारांनी तो विरोध झुगारून नवाब मलिकांना उमेदवारी दिली. समाजवादी पक्षाचे (एसपी) अबू आझमी मुंबईच्या या मुस्लिमबहुल जागेवरून तीन वेळा आमदार आहेत आणि चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. 3. माहीम: 'राजपुत्रा'समोर दोन्ही शिवसेनेचे कडवे आव्हान माहीम मतदारसंघात शिवसेनेतील ठाकरे गट, शिंदे गट आणि मनसेतील राज ठाकरे या तीन गटांमध्ये लढत आहे. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे मनसेकडून निवडणूक लढवत असून ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सुरुवातीला भाजपने अमितला पाठिंबा देण्याचे बोलले होते, मात्र नंतर भाजपने मनसेला शिवडी जागेवरच पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. माहीम जागेवर महायुतीच्या वतीने शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांना भाजप पाठिंबा देणार आहे. महायुतीने मागे घेतलेले अमित ठाकरे यांना झटका मानला जात आहे. यामुळे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेले अमित ठाकरे यांची विधानसभेची वाट खडतर असणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article