आमचा लढा महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांविरोधात:आदित्य ठाकरेंचा महायुतीवर जोरदार हल्लाबोल

2 hours ago 1
युवासेना प्रमुख आदित्या ठाकरे यांची आज मातोश्री येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी सरकारचा मुंबई लुटीचा छुपा डाव समोर आणला. मुंबई फुकटात अदानीच्या घशात टाकली जात आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेंना जिंकता येत नाही म्हणून मुंबई अदानीच्या घशात घातली जात आहे. मुंबईतील महत्वाच्या जागांचा लिलाव केला जातोय. पालिकेकडे पैसे नाहीत म्हणून लिलाव केला जाणार आणि पैसे उभे करणार आहेत. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने मुंबई महापालिकेची आर्थिक घडी बसवलेली होती. मुंबईकरांवर टॅक्स लावला नाही. पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबई लुटली, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. यावेळी टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, कंत्राटदाराला पैसे दिले आणि रस्ता झालाय, असं एक काम दाखवा. याच पैशांतून त्यांनी खिसे भरले क्रॅाफेड मार्केट जवळची मंडई, मलबार हील येथील पॅावर स्टेशन आणि वरळीतील अस्लाल्ट प्लांट यांचा लिलाव केला जाणार आहे. पण जिथे लोकप्रतिनिधी नाहीत अशा ठिकाणी प्रशासकांना लिलाव करण्याचा अधिकार दिला कोणी? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरेंनी केला. हा लढा महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांविरोधात- आदित्य ठाकरे मोदींनी नोट बंदीचा घेतलेला निर्णय फसला, पीएम केअर फंडा सारखं आम्ही नियोजन केलेल नाही, पण मुंबईतल्या या मंडईनंतर हे लोक कोळीवाड्यात जातील. तो भाग देखील अदानीच्या घशात घातला जाईल. त्यामुळे माझा आणि उध्वव ठाकरेंचा लढा हा महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांच्या विरोधात आहे. लुटारू सगळे माझे प्रतिस्पर्धी आहेत. असं आदित्य ठाकरे म्हणाले . आमच सरकार आलं तर जे अयोग्य आहे ते सगळ आम्ही रद्द करु मुंबई जिंकता येत नसल्यानं मुंबई अदानींच्या घशात घातली जातेय . पालिकेची कॉफर्ड मार्केटमधील शिवाजी महाराज मंडई, वरळीतील अस्फाल्ट प्लांट व मलबार हिलमधील पॉवर स्टेशनची जागा लिलावात काढली जातंय. आम्ही पालिकेत असताना ९२ हजार कोटींच्या ठेवी वाढवल्या. परंतु आता पालिका दीड ते दोन लाख तुटीत गेली आहे. त्यामुळे पालिकेच्या जागांचा लिलाव सुरू केलाय. भाजपवाले व शिंदे हुतात्मा स्मारकही लिलावात काढतील. पालिका विकण्याचे काम सुरूय. आचारसंहितेत कुणाला काय परवानगी आहे ते निवडणूक आयोगाने सांगावे. अनेक ठिकाणी पोस्टर आहेत. रेल्वेत जाहीराती सुरू आहेत, असं आदित्य ठाकरेंनी म्हणलं.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article