नियंत्रण सुटल्यानंतर पलटी खात रस्त्याच्या कडेला जाऊन थांबलेली चारचाकीPudhari Photo
Published on
:
17 Oct 2024, 3:44 pm
Updated on
:
17 Oct 2024, 3:44 pm
पूर्णा : तालूक्यातील पूर्णा नांदेड महामार्गावर गौर गावाजवळील गोविंदपूर फाट्या नजीक मुख्य रोडवर भरधाव वेगात जाणारी कार पलटी झाल्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी (दि.17) घडली. भरधाव असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर कार पलटी होवून रोडखाली पडली. मात्र त्यातील प्रवाशी किरकोळ मार लागून बचावल्या गेले.
या बाबत अधिकची माहिती अशी, पूर्णा तालूक्यातील नांदेड रोडवरील गोविंदपूर फाट्या जवळ गुरुवार रोजी सकाळच्या सुमारास (एमएच १४ एलई ४८९३) या क्रमांकाची चारचाकी कार भरधाव वेगात पूर्णेहून नांदेड जात होती. तेव्हा गौर बस स्थानक भागात असताना चालकाला डुकली लागल्यामूळे चालकाचा कारवरील ताबा सुटून कार रस्त्यालगत असणाऱ्या काटेरी गवतात जावून पलटीखात उबडीतीबडी झाली. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून कारमधील प्रवाशी वाघमारे,नागेश वाघमारे व दोन दोचाजणास दुखापत झाली.अपघात होताच आसपासच्या नागरिकांनी घटना स्थळी धाव घेत अपघात ग्रस्तांना बाहेर काढण्यात आले.