आम्हाला नियुक्तिपत्र द्या ! 623 भावी अधिकार्‍यांचे नियुक्तिपत्रासाठी आंदोलन

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

04 Oct 2024, 5:17 am

Updated on

04 Oct 2024, 5:17 am

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 चा निकाल जाहीर करूनही अंतिम निकाल आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणार्‍या 23 संर्वगातील 623 राजपत्रित अधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन केले.

राज्य शासनातील गट अ आणि गट ब अशा विविध संवर्गांतील 623 उमेदवारांची 20 मार्च 2024 रोजी तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान, खेळाडूंचे प्रमाणपत्र, समांतर आरक्षण, दिव्यांग उमेदवाराच्या दाव्यांची फेरपडताळणी आदी संदर्भात काही दावे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधीकरण (मॅट) मध्ये दाखल झाले होते. हे सर्व दावे निकाली निघाले आहेत. सध्या या परीक्षेसंदर्भात कुठलेही प्रकरण न्यायालयात प्रलंबित नाही. मॅटच्या आदेशानुसार अंतिम यादी लावणे अपेक्षित असताना अंतरिम यादी जाहीर करण्यात आली.

परीक्षेकरिता जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. या परीक्षेतून निवड झालेले उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, तहसीलदार अशा 23 संर्वगांतील 623 भावी राजपत्रित अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असल्याने आंदोलन करण्यात आले. तसेच, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना मागणीचे निवदेन देण्यात आले. या वेळी उमेदवारांच्या वतीने सरकार विरोधात घोषणा देत लवकरात लवकर नियुक्तिपत्र दिले नाही, तर तिव— आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article