आयटीआयला संतांचे नाव हा त्यांच्या कार्याचा गौरवच- दिवे:वरुड येथील शासकीय आयटीआयचा नामकरण सोहळा

4 days ago 3
वरुड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संत अच्युत महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण होणे, हा संताच्या कार्याचा गौरव, सन्मान असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष कार्य अधिकारी, अमरावती येथील संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे उपाध्यक्ष व संत अच्युत महाराज सत्संग मंडळाचे अध्यक्ष सुधीर दिवे यांनी केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा नामकरण सोहळा दिवे यांच्या हस्ते पार पडला. त्या प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी संत अच्युत महाराज जन्मभूमी संस्थानचे अध्यक्ष दत्ता शिंदे, संत एकनाथ देवस्थानचे गिरिधर देशमुख, राकाँ (अजित पवार) प्रदेश सदस्य प्रमोद पाटील कोहळे, तारेश देशमुख , प्राचार्य व्ही. आर. पडोळे, प्राचार्य किशोर तडस आदी उपस्थित होते. पुढे बोलताना सुधीर दिवे यांनी या संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या समाजसेवेची माहिती विषद केली. तसेच भगवान विश्वकर्मा, दसरा पूजनाच्या निमित्ताने या संस्थेतून विश्वकर्मासारखे विद्यार्थी घडवावे, असा आशावादही व्यक्त केला आहे. या प्रसंगी संत अच्युत महाराज सत्संग मंडळाचे अध्यक्ष सुधीर दिवे यांच्या हस्ते प्राचार्य व्ही. आर. पडोळे, शिल्प निरीक्षक नीलेश गायकी, वरिष्ठ लिपिक सचिन गणोरकर, अशोक.खापरे आदींचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी दीप प्रज्वलन करून शस्त्रपूजन व भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक खापरे यांनी केले. या वेळी मोठ्या संख्येने

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article