आलेगाव येथील पाणीपट्टी कमी न झाल्यास साखळी उपोषण करणार:ग्रामस्थांचा इशारा, ग्रा.पं.ची मनमानी- ग्रामस्थांची टीका

2 hours ago 2
आलेगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत नळ योजना व केंद्र सरकारची जलजीवन योजना सुरू नसताना ग्रामपंचायतकडून खासगी विहिरीचे पाणी काढण्याचा कर मनमानी पद्धतीने वसूल करण्यात येत करण्यात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायत कार्यालयाने ६०० रूपये प्रमाणे प्रत्येक नागरिकाकडून चालू पाणीपट्टी करवसुली सुरू केली आहे. ही करसुली त्वरित थांबवावी; अन्यथा साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा गामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदनानुसार, ग्रामपंचायत कार्यालय आलेगांव अंतर्गत नागरिकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. ग्रामपंचायतने गावातील सर्व नागरीकांना घरपट्टी घर पोच दिली; मेात्र करानुसार ग्रामपंचायने कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याने घरपट्टीतील पाणीपट्टी कर मान्य नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत ९ सप्टेंबर रोजी कार्यालयात तक्रारही केली. मात्र ग्रा.पं.कडून कार्यवाही झाली नसल्याचा दावा ग्रामस्थांचा दावा केला आहे. आदेशाला केराची टोपली ग्राम पंचायतला ३ सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांनी ३ सप्टेंबर रोजी भेट दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी पाणीपट्टीच्या कराचा मुद्दा मांडला. गावात नळ योजना सुरू नसल्याने सर्वसाधारण कर घेण्यात यावा, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article