आल्याचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या आल्याचा चहा करण्याची योग्य पद्धत

6 days ago 2

How to marque Ginger Tea : आपल्याकडे चहा न आवडणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे. बहुतेक लोकांना चहा प्यायला आवडतो ऋतू कोणताही असो, लोक दिवसभरात दोन चार कप चहा सहज पितात. सकाळी एका कप चहा पीला तर चैतन्य आल्या सारखे वाटते.चहा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो.

लोक अनेक प्रकारचे चहा तयार करतात आणि पितात. काही लोकांना वेलची टाकलेला चहा आवडतो तर काहींना आल्याच्या चहाचे वेड असते. लोक हिवाळ्यात आल्याचा चहा अगदी आवर्जून पितात कारण त्यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे इत्यादी समस्यांचा त्रास कमी होतो.याशिवाय आले गरम असते.म्हणून हिवाळ्यात आल्याचा चहा मोठ्या प्रमाणात पिला जातो. अनेकदा लोक आल्याचा चहा बनवतात पण त्याची चव तितकीशी चांगली नसते. काही वेळा लोक जास्त आले चहामध्ये टकतात त्यामुळे चहाला कडूच चव येते. यासाठी चहा करताना त्यामध्ये अद्रक किती प्रमाणात टाकावी याची माहिती असणे गरजेचे आहे.

आल्याचा चहा बनवण्याची योग्य पद्धत

बहुतेक लोक अद्रक चहाला प्राधान्य देतात. हा चहा बनवताना काही लोक चहाच्या भांड्यात एकाचवेळी दूध, साखर, चहापत्ती, आले,आणि पाणी टाकतात. पण तुम्ही सुद्धा ही चुकी करत असाल तर अजिबात करू नका. सर्व गोष्ट एकत्र टाकल्याने चहा चांगला होत नाही. सर्वप्रथम एका भांड्यात पाणी, दूध आणि साखर घालून उकळू द्या. आले सोलून त्याचे छोटे तुकडे करा काही लोक आले इतक्या बारीक कुस्करतत की त्याचा रस भांड्याबाहेर राहतो. पाणी, दूध आणि साखरेला उकळी आल्यानंतर त्यात आले टाकून एक मिनिटे उकळू द्या.

आल्याचा रस भांड्यात राहिल्यास चहाला पूर्ण चव येत नाही. आल्याचे तुकडे करण्या व्यतिरिक्त तुम्ही आले किसून देखील चहा मध्ये टाकू शकता. चहामध्ये अद्रक किसून टाकल्याने तो उकळल्यानंतर आल्याचा अर्क चहा मध्ये चांगल्या पद्धतीने मिसळतो. त्यानंतर त्यामध्ये चहापत्ती टाका आणि आणखीन एक ते दोन मिनिटे चहा उकळू द्या. तुम्ही किती कप चहा बनवणार आहात त्यानुसार प्रत्येक गोष्टीचे प्रमाण ठरवा.

आल्याचा चहा पिण्याचे फायदे

आले हे उष्ण असते. त्यामुळे हिवाळ्यात त्याचे सेवन करणे फायदेशी ठरेल. आल्याचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे हिवाळ्यात अनेक आजारांपासून बचाव होतो. सर्दी, खोकला आणि घसा खवखवल्यास आल्याचा चहा प्या. संसर्गाशी लढण्यास हा मदत करतो कारण आल्यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात. पचनक्रिया व्यवस्थित राहते.वेदना आणि सूज बरी होते. तसेच उलटी आणि मळमळ होण्याचे समस्या देखील दूर होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article