Published on
:
22 Nov 2024, 10:58 am
Updated on
:
22 Nov 2024, 10:58 am
कर्जत -189 विधानसभा मतदार संघाचा मागील सन. 1952 ते सन. 2024 चा इतिहास पाहाता या मतदार संघात आमदार म्हणून सन.1952 मध्ये प्रथम काँग्रेस पक्षाचे न.स. ठोसर, सन.1957 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीचे वसंत राऊत, 1962 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीचे कृ. रा. मुढे, सन. 1967 मध्ये शेकापचे सुमंत राऊत, सन. 1972 मध्ये काँग्रेस पक्षाचे बी. एल पाटील, सन. 1978 मध्ये पुन्हा रेडी काँग्रेस पक्षाचे बी. एल पाटील, सन. 1980 मध्ये काँग्रेस पक्षाचे तुकाराम सुर्वे, सन. 1985 मध्ये शेकापचे सुमंत राऊत, सन. 1990 मध्ये शिवसेनेचे देवेंद्र साटम, सन. 1995 पुन्हा शिवसेनेचे देवेंद्र साटम, सन. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश लाड, सन. 2004 मध्ये पुन्हा शिवसेनेचे देवेंद्र साटम, सन.2009 ते सन. 2014 या दोन टर्ममध्ये पुन्हा सुरेश लाड, सन. 2019 मध्ये शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे कामगिरी बजावली आहे.
189- कर्जत विधानसभा मतदार संघातील सन. 1952 ते 2019 पर्यंत झालेला बदल पाहाता या मतदार संघात सन. 19 52 मध्ये खालापूर - माथेरान असा मतदार संघ निमार्ण झाल्याने प्रथम झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये या मतदार संघात काँग्रेस पक्षाने पहीली बाजी मारली होती. या नंतर या मतदार संघाची पुनर्रचना झाल्याने या मतदार संघात पेण, कर्जत, खालापूर, उरण व सुधागड या तालुक्याचा समावेश झाला व 1957 ते सन. 1962 या दोन टर्ममध्ये झालेल्या निवडणूकी मध्ये या मतदार संघात संयुक्त महाराष्ट्र समितीनी आपले वर्चस्व राखले होते. त्यानंतर सन. 1967 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीचे वर्चस्व मोडीत काढत शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली होती. मात्र सन. 1972 मध्ये या मतदार संघात काँग्रेस पक्षाने बाजी मारली. त्यानंतर सन. 1978 मध्ये रेडी काँग्रेस पक्षाने तर सन. 1980 मध्ये काँग्रेस पक्षाने पुन्हा बाजी मारली. तर सन. 1985 मध्ये पुन्हा शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली. मात्र 1990 ते सन. 1995 या दोन टर्ममध्ये या मतदार संघात शिवसेनेचे भगवे वादळ येत या मतदार संघात शिवसेनेनी बाजी मारत आपले वर्चस्व राखले होते.
परंतू सन. 1999 मध्ये शरदचंद्र पवार यांनी काँगेस पक्षाची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्याने या मतदार संघात 1999 च्या निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानी बाजी मारली होती. तर सन. 2004 च्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करत पुन्हा या मतदार संघातील गड शिवसेनेनी राखला होता. तर सन. 2009 ते सन. 2014 च्या निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत दोन टर्ममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारत पुन्हा आपले वर्चस्व राखले होते. मात्र सन. 2019 च्या निवडणूकीत पुन्हा या मतदार संघात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव करत पुन्हा शिवनेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी शिवसेनेचा गड राखला, परंतू 21 जून 2022 रोजी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातील 40 व अपक्ष आमदारांसोबत बंड केल्याने शिवसेनेत फुट पडल्याने शिवसेने मध्ये शिंदे गट शिवसेना व उध्दव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना अशा दोन शिवसेना पक्षाचा जन्म झाल्याने मात्र या मतदार संघात सन. 2019 च्या निवडणुकीत शिवसेने कडून निवडूण आलेले आमदार महेंद्र थोरवे हे शिंदे गटात गेल्याने आता होऊ घातलेल्या 2024 च्या विधानसभा निवडणूकीला या मतदार संघात महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे तर महाविकास आघाडी कडून शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उमेदवार नितिन सावंत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतर निमार्ण झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आजित दादा गटात असलेले सुधाकर घारे यांनी पक्षाचा राजीनामा देत बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरले असल्याने, सन. 2024 च्या विधानसभेच्या निवडणूकीची मतदान प्रकिया ही पार पडली. तर या मतदार संघात महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे, अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार नितिन सावंत यांच्यात काटे की टक्कर पाहाता या मतदार संघात महायुती, अपक्ष की महाविकास अघाडी वर्चस्व राखणार याकडे मतदारांसह सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे