इराणमध्‍ये कोळसा खाणीत भीषण स्‍फोट, ३० ठार

1 hour ago 2

इराणमधील कोळसा खाणीत झालेल्या स्फोटानंतर आपत्कालीन आणि बचाव पथके दुर्घटना स्‍थळी धाव घेत मदतकार्य सूरु केले.(Image source- X)

पुढारी वृत्तसेवा

Published on

22 Sep 2024, 8:38 am

Updated on

22 Sep 2024, 8:38 am

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इराणमधील कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात ३० जण ठार तर १७ जण जखमी झाल्‍याचे वृत्तसंस्‍था 'एपी'ने दिले आहे. खाणीत आणखी २४ कामगार अडकले असून, मृतांचा आकडा वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. ( Iran coal mine blast )

इराणची राजधानी तेहरानपासून सुमारे 540 किलोमीटर अंतरावर असलेल्‍या पूर्व इराणमधील तबासमधील कोळसा खाणीत शनिवारी (दि.२१ सप्‍टेंबर) रात्री कोळसा खाणीत स्‍फोट झाला. मिथेन वायूच्या गळतीमुळे झालेल्‍या दुर्घटनेवेळी सुमारे ७० कामगार खाणीत काम करत होते. प्रशासनाने आपत्कालीन आणि बचाव पथके तत्‍काळ स्फोटाच्या ठिकाणी पाठवली. खाणीत अजूनही २४ जण अडकले असण्याची शक्यता आहे.

इराण दरवर्षी सुमारे 3.5 दशलक्ष टन कोळशाचा वापर करतो; परंतु दरवर्षी केवळ 1.8 दशलक्ष टन कोळसा काढतो. उर्वरित आयात केले जाताे. याचा बहुतांश वापर देशातील पोलाद गिरण्यांमध्ये केला जाताे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article