नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. File Photo
Published on
:
28 Nov 2024, 9:46 am
Updated on
:
28 Nov 2024, 9:46 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीच्या प्रकियेवर शंका उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (दि.२८) संशय व्यक्त केला आहे. या विरोधात आमचे आमदार आणि उमेदवार कोर्टात जाणार आहेत, असे पटोले यांनी यावेळी सांगितले.
पटोले म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांच्या पतीनेही निवडणुकीवर आक्षेप घेतला आहे. याबाबतचा त्यांनी व्हिडिओ दाखवला. निवडणूक आयोगाने पारदर्शकता पाळाली नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सात वाजता मतदाना झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट उशीरा देण्यात आला. निवडणूक आयोगाने सायंकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदानाची टक्केवारी दिली. परंतु, ६२.२ टक्के मतदान झाल्याचे त्यांनी रात्री ११.३० वाजता सांगितले. यावरून साडेसहा तासांमध्ये मतदान करुन घेतल्याचे समोर येते. तर दुसऱ्या दिवशी आयोगाकडून सांगितले जाते की, ६६.५ टक्के मतदान झाले. मतदान झाल्यानंतर मतदानाची माहिती निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेत दिली जाते, ही पद्धत आहे. परंतु महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकाराची पत्रकार परिषद घेतलेली नाही.
सुमारे ७६ लाखांची मतांची वाढ झालेली आहे. त्यामुळे आयोगाच्या पारदर्शकेतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जनतेची मते चोरण्याचे आणि डाका टाकण्याचे काम आयोगाने केल्याचे यातून सिद्ध होत आहे. याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे.