Published on
:
28 Nov 2024, 11:23 am
Updated on
:
28 Nov 2024, 11:23 am
छत्रपती संभाजीनगर : शहरात चोरांनी एकाच रात्रीत वेदांतनगर भागात मोवाईल शॉपी, किराणा दुकान तर साताऱ्यातही एक किराणा दुकान फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. तर सडको भागातील हिंगलाज माता मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटीतील रोख, देवीचा सोन्याचा हार, चांदीचा मुकुट यासाा अन्य ऐलज लंपास केला. या घटना मंगळवारी (दि. २६) रात्री घडल्या. या घटनांवरून चोरांनी पोलिसांना खुले आव्हान दिल्याचे दिसून येत आहे.
फिर्यादी सचिन मोहन बोपले (४४, रा. बी सेक्टर, एन-१२, हडको) हे फिर्यादी आहेत. ते अभ्यासिका चालवतात. त्यांच्या कॉलनीत रोडवर हिंगलाज माता मंदिर आहे. या मंदिराच्या वळ मजल्यात सचिन यांची जय चजरंग नावाची अभ्यासिका आहे, ते नियमित सकाळी ७ वाजता अभ्यासिका उघडतात. रात्री १०.३० वाजता बंद करतात. मंगळवारीही नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री ९ वाजता हिंगलाज माता मंदिर बंद केले. बुधवारी सकाळी ७.३० वाजता ते मंदिर व अभ्यासिका उघडण्यासाठी गेले. तेव्हा मंदिराचे कुलूप तुटून खाली पडलेले दिसले, त्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पाहिले असता दानपेटीचेही कुलूप तुटलेले होते.
दानपेटीतील ८ हजार रुपये रोकड तसेच, देवीच्या गळ्यातील ५ ग्रॅम सोन्याची पोत, डोक्यावरील ३० हजारांचा चांदीचा मुकुट अणि १० हजार रुपयांचे पंचधातूचे कासव, गदा, तलवार, त्रिशूळ, चक्र आदी ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर ही माहिती स्थानिकांना देत सिडको पोलिसांना कळविली. या प्रकरणी सचिन बोंचले यांच्या फिर्यादीवरून सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल नाणेकर करीत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली.
साताऱ्यात किराणा दुकानातून १५ हजार लंपास
सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिल्कमिल्क कॉलनीमध्ये असलेल्या मराठवाडा ट्रेडर्स किराणा दुकानाचे शटर उचकटून मंगळव रच्या (दि.२६) रात्री चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दिवसभराची दुसऱ्या दिवशी बँकेत जमा करण्यासाठी ठेवलेली ९५ हजार रूपयांची रोख रक्कम चोस्ट्यांनी पळवली आहे. या प्रकरणात मोहम्मद सादेर मोहम्मद युनूस यांच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवाला आहे. दुकानदार नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले होते.
बुधवारी सकाळी दुकानात आल्यानंतर शटरचे दार उचकटल्याचे दिसून आले. त्यानंतर पाहणी केल्यावर दुकानातील ९५ हजारांची रोकड लंपास झाल्याचे स्पष्ट झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वेदांतनगर भागात दोन दुकाने फोडली
वेदांतनगर भागात चोरांनी मंगळवारी रात्रा दोन दुकाने फोडली. यात फिर्यादी अक्षय साहेबराव होने (२४) याचे हटिल इंद्रदीप आरटीओच्या ऑफिसच्या पाठीमागे साई नावाने मोबाईल शॉप आहे. घोराने दुकानातून ४६ छोटे मोबाईल, ५० हून अधिक हेडफोन, २५ मन्यूट्युथ स्पीकर, १० चार्जर यासह ३ हजारांची रोकड असा १ लाख १० हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला. तर फिर्यादी आकाश मनमोहन अहवाल (३०) याचे रेल्वेस्टेशन रोडवरील अहसेन प्रोव्हिजन हे दुकान फोडून चोरांनी २१ हजार २८० रुपयांचे सिगारेटचे ७ बॉक्स आणि सात हजारांची रोकड असा २८ हजार २८० रुपयांचा ऐवज लंपास केला.