उमेदवारांच्या घरांसह पक्ष कार्यालयावर असेल पोलिसांची तगडी सुरक्षाव्यवस्था, ग्रामीणमध्ये सहा ठिकाणी मतमोजणी, 1858 पोलिसांचा ‘वॉच’
3 hours ago
1
अमरावती विधानसभा निवडणूकीसाठी शनिवारी (दि. २३) मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी शहर व जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व प्रमुख उमेदवारांच्या घराबाहेर तसेच पक्षांच्या कार्यालयाजवळ पोलिसांची तगडी सुरक्षा राहणार आहे. यासोबतच शहरातील सर्व प्रमुख चौकात शनिवारी सकाळपासूनच पोलिसांचे फिक्स पॉइंट राहणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शुक्रवारी (दि. २२) पत्रकार परिषदेत दिली आहे. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अमरावती व बडनेरा मतदारसंघाची मतमोजणी लोकशाही भवनमध्ये होणार आहे. या ठिकाणी पहाटे ४ पासून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात राहणार आहे. याशिवाय शहरातील राजकमल चौक, राजापेठ, पंचवटी, बडनेरा, वलगाव, नांदगाव पेठ, रेल्वे स्टेशन, इर्विन चौक यासह अन्य महत्त्वाच्या चौकांमध्ये पोलिसांचे फिक्स पॉइंट राहणार आहेत. शनिवारच्या बंदोबस्तासाठी ३० अधिकारी आणि ५०० पोलिस अंमलदार तैनात असतील. याशिवाय मोठ्या प्रमाणात राखीव पोलिस आहेत. यासोबतच अमरावती व बडनेरा मतदारसंघातील सर्व प्रमुख उमेदवार तसेच आयुक्तालयाच्या हद्दीत ज्या उमेदवारांचे घर आहे, अशा सर्व प्रमुख उमेदवारांच्या घरी तसेच त्यांच्या पक्ष कार्यालयावर पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. याशिवाय एखाद्या अपक्ष उमेदवारांनी सुरक्षेची मागणी केल्यास पोलिस त्यांना किंवा त्यांच्या कार्यालयालासुद्धा सुरक्षा देणार आहेत, असेही पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे. दोन मतदारसंघाची मतमोजणी होणाऱ्या लोकशाही भवनमध्ये केवळ अधिकृत पास असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. याचवेळी लोकशाही भवनसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्यामुळे बियाणी चौक ते विद्यापीठ चौकापर्यंतच्या मार्गावरून वाहतूक सुरू ठेवणे शक्य नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी ६ पासून ते मतमोजणी पूर्ण होईस्तोवर हा मार्ग वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर शनिवारी वाहनचालकांना करावा लागणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त रेड्डी यांनी दिली. या पत्रकार परिषदेच्या वेळी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, कल्पना बारवकर आणि सागर पाटील यांची उपस्थिती होती. अमरावती ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत अचलपूर, धारणी, दर्यापूर, चांदूर रेल्वे, तिवसा आणि मोर्शी या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणी केंद्रांवर तसेच संबंधित शहरात पोलिसांकडून तगडा बंदोबस्त राहणार आहे. या बंदोबस्तासाठी पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक यांच्यासह सहा डीवायएसपी, १७ पीआय, ७० एपीआय, पीएसआय, २९ वाहतूक पोलिस, ३० पोलिस छायाचित्रकार, आरसीपी आणि एसआरपीफचे ९० जवान, सीआरपीएफ आणि एसएपीएफचे ४०० जवान सोबत २५० गृहरक्षक दलाचे जवान मतमोजणीच्या दिवशी सकाळी ६ पासून तैनात राहणार आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)