उर्दू शाळेच्या गणवेशाचे कापड नाही, दुसरा गणवेशही महिला गट शिवणार:पहिला पोहोचला, दुसऱ्या गणवेशासाठी दीड महिन्यांची प्रतीक्षा

1 day ago 2
नगर एक राज्य एक गणवेश धोरणांतर्गत यंदा सर्व विद्यार्थ्यांचे गणवेश महिला आर्थीक विकास महामंडळाच्या बचत गटांकडून शिलाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिला गणवेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला, पण दुसरा गणवेश अद्यापही अपूर्णच आहे. त्यातही उर्दू माध्यमांच्या मुलींच्या स्काउट गाईड गणवेशाचे कापड अद्याप बचतगटांपर्यंत पोहोचले नसल्याने, सरसकट दुसरा गणवेश उपलब्ध होण्यासाठी दीड महिना वाट पहावी लागणार आहे. विद्यार्थ्यांचे दोन्ही गणवेश यापूर्वी शाळा स्तरावरच उपलब्ध करून दिले जात होते. परंतु, राज्याने एक गणवेश योजना आणून कापडाचा पुरवठा केला. हे कापड महिला बचत गटांकडून शिलाई करून प्रत्येकी दोन गणवेश देण्याचा निर्णय घेतला. परंतु, निर्णयातील धरसोडीमुळे आता स्काउटचा गणवेश शिलाईची जबाबदारी पुन्हा शाळा समितीवर सोपवण्यात आली होती. परंतु, समित्यांनी हा गणवेश शिवण्यास नकार दिला, तसा सुमारे तीन हजारांवर शाळांनी झेडपीला ठराव दिल्याने पेच वाढला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेने पुन्हा महिला महामंडळाला पत्रव्यवहार करून गणवेश शिलाई करून देण्याची विनंती केली. शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर दुसरा गणवेश महिला गटांकडून शिलाई करण्याचे काम सुरू झाले. परंतु, उर्दू माध्यमांच्या मुलींसाठी अद्याप कापड उपलब्ध न झाल्याने, शासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. महिनाभरात होतील गणवेश ^स्काउटगाईडसाठी कापड उपलब्ध झाले असून, हे गणवेश ट्रान्सपोर्टची व्यवस्था करून दिली जाणार आहे. हे गणवेश महिन्यात शिलाई पूर्ण होईल. गणवेशासाठी उर्दू माध्यमाच्या मुलींसाठीचे कापड अद्याप उपलब्ध नाही. उर्वरित कापड उपलब्ध झाले आहे. शिलाईला सुरूवात झाली. संजय गर्जे, महिला आर्थिक विकास मंडळ.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article