ऐतिहासिक श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीची तटबंदी अभेद्य...!

2 hours ago 1
गणेश सोनवणे

Published on

25 Nov 2024, 6:36 am

Updated on

25 Nov 2024, 6:36 am

श्रीकांत बिरवाडकर , म्हसळा

रायगड जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या ऐतिहासिक महत्व असलेल्या दक्षिण काशी हरिहरेश्वर, सुवर्ण गणेश मंदिर दिवेआगर धार्मिक तीर्थक्षेत्र व अरबी समुद्राला जोडलेले हरिहरेश्वर बिच, दिवेआगर बिच, श्रीवर्धन बिच अशा विविधांगी निसर्गरम्य पर्यटनाची उधळण लाभलेल्या कोकणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यातील म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव, रोहा या पाच तालुक्यांचा समावेश असलेल्या 193 श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात (अजित पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांची कन्या तथा राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ऐतिहासिक रेकॉर्ड ब्रेक विजयाला गवसणी घालून विरोधकांना भुईसपाट केले आहे. तर आदिती तटकरे यांच्या दुसर्‍यांदा विजयाने 2009 पासून राष्ट्रवादीने सलग विजयाचा चौकार मारला आहे. ऐतिहासिक महत्व असलेल्या श्रीवर्धन मध्ये खासदार सुनिल तटकरे यांनी अगदी कार्यकुशलतेने आणी विकासात्मक दूरदृष्टी ठेऊन राष्ट्रवादीची उभारलेली तटबंदी अभेद्य असल्याचे विरोधकांना छातीठोकपणे दाखवून दिले आहे. 2024 च्या विधानसभा निवडणूकीच्या मैदानात विरोधकांना चारी मुंड्या चितपट करून तटकरेंनी आपला गड शाबूत ठेवला आहे. राज्यात महायुतीचे सरकारच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या विभागाने अंमलात आणलेल्या लाडकी बहिण योजनेच्या ब्रँड आंबेसेंडर आदिती तटकरे यांच्या विजयाने श्रीवर्धन मध्ये लाडकी बहिण हसली तर शरद पवारांची तुतारी फसली... अशा मिश्किल टोळे बाजीच्या घोषणा कार्यकर्ते देऊ लागले आहेत. आदिती तटकरे यांच्या विक्रमी मताधिक्याने विरोधकांना मतदारांनी दाखविली घरची वाट आणि विरोधक झाले भुईसपाट अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

82 हजार पेक्षा जास्त मताधिक्य घेणार्‍या आदिती तटकरे या पहिल्याच मानकरी ठरल्या

श्रीमंत पेशव्यांची भूमी म्हणून ओळख असलेल्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आदिती तटकरे यांनी सलग दुसर्‍यांदा विजयाचा गुलाल उधळून विजयश्री खेचून आणून नवा इतिहास घडविला आहे. श्रीवर्धन मतदार संघाच्या इतिहासात 82 हजार पेक्षा जास्त मताधिक्याने रेकॉर्ड ब्रेक विजय संपादन करणार्‍या आमदार आदितीताई ह्या पहिल्याच मानकरी ठरल्या आहेत. आदिती तटकरे यांच्या विजयाची बातमी समजताच म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव रोहा तालुक्यातील नागरिकांनी तसेच मुंबई, पुणे शहर निवासी हितचिंतक, नागरिकांनीही विजयाचा गुलाल उधळून, फटाके फोडत, एकमेकाला मिठाई भरवून आनंद साजरा केला.

आ.अनिकेत तटकरेंनी डीजे च्या गाण्यांवर थिरकत केला विजयी जल्लोष

नवनियुक्त आमदार आदिती तटकरे आणि युवा नेते माजी आमदार अनिकेत तटकरे यांना महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी खांद्यावर उचलुन, अलींगण देत ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या गाण्यांवर थिरकत आनंद साजरा केला. बाप तो बाप है ..., राष्ट्रवादी पुन्हा, राष्ट्रवादी पून्हा, आली आली आदिती आली.. आदिती आली .... या उत्साही गाण्यांच्या आवाजात आमदार अनिकेत तटकरेंनी ठेका धरत नाचून कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी वाढवून जल्लोष केला.

श्रीवर्धन मध्यवर्ती प्रशासकीय भवन येथे 193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली तेव्हा पहिल्या फेरीपासूनच मतकेंद्रांमध्ये आमदार आदिती तटकरे यांनी खात्रीशीर अपेक्षित असलेली मतांची आघाडी घेऊन आपल्या विजयी वाटचालीकडे घोडदौड सुरू केली.

श्रीवर्धनच्या इतिहासात विक्रमी मतांची नोंद

महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळातील एकमेव महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात दणदणीत विजय मिळवला आहे. एकतर्फी विजय मिळवताना आदिती तटकरे यांनी 82798 मताधिक्य घेत प्रथमतच श्रीवर्धन मतदार संघात इतक्या मोठ्या फरकाने विजय प्राप्त करण्याचा इतिहासात नोंद झाली आहे.

महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी किंगमेकर ठरलेल्या आदिती तटकरे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांचा तब्बल 82798 मतांनी पराभव केला आहे.

(राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) महायुतीच्या उमेदवार आदिती तटकरे यांना 116050 मते मिळाली तर (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट) महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांना अवघी 33252 मते मिळाली आहेत. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजाभाऊ ठाकुर यांना 4080, बहुजन समाज पार्टीच्या अश्विनी साळवी यांना 718, मनसेचे फैजल पोपेरे 2125, कुणबी समाज नेते बळीराज सेनेचे कृष्णा कोबनाक यांना अवघी 490 मते मिळाली आहेत. अन्य पाच अपक्ष उमेदवारांना 2740 आणि नोटाला 3375 मते पडली आहेत.

श्रीवर्धन मतदार संघात झालेल्या 58 टक्के मतदानात अर्थात 265354 मतदाना पैकी आदिती तटकरे यांनाच 116050 मते मिळाली. याचाच अर्थ 43 टक्के मताधिक्य एकट्या आदिती तटकरे यांना मिळाले आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात विजयाचा पहिला निकाल श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार आदिती तटकरे यांचा लागला. यावेळी विजयाचा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुळाल उधळत विजयाचा एकच जल्लोष केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article