तडीपार सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुलासह अमली पदार्थ जप्त:पुण्याच्या कात्रज भागात पोलिसांची कारवाई

2 hours ago 1
माेक्का गुन्हयातील एका गुन्हेगारास पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असताना देखील, ताे बेकायदेशीररित्या पुण्यात फिरताना मिळून आला असून त्याच्या अंगझडतीत पोलिसांनी देशी बनावटीच्या पिस्तुलासह, मेफेड्रोन, कोयता जप्त केला. कात्रज भागात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुंडाबरोबर असलेल्या साथीदारांना अटक करण्यात आली. याप्रकरणी तौसिफ अमिर सय्यद उर्फ चुहा (वय 28, रा. संतोषनगर, कात्रज) त्याचे साथीदार सूरज राजेंद्र जाधव (वय 35, रा. रुपचंद तालीमसमोर, करमाळा, जि. सोलापूर), मार्कस डेव्हीड इसार (वय 29, रा. गगनगिरी मंगल कार्यालयाजवळ, धानोरी, विश्रांतवाडी), कुणाल कमलेश जाधव (वय 25, रा. प्रसाद रेसीडन्सी, सोमनाथनगर, वडगाव शेरी ) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार जनाब (रा. लष्कर) पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस शिपाई धनाजी धोत्रे यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुन्हेगार तौसिफ सय्यद याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गु्न्हे दाखल असून त्याच्याविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. सय्यद याला मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले होते. सय्यद आणि साथीदार कात्रज भागात दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संतोषनगर परिसरात सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याबरोबर असलेले साथीदार जाधव, इसार, जाधव यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार जनाब पसार झाला. सय्यद याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस, मेफेड्रोन, वजन काटा, स्क्रू ड्रायव्हर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. उपनिरीक्षक मोहन कळमकर पुढील तपास करत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article