शेअर बाजारात 'महा त्सुनामी'! सेन्सेक्स- निफ्टी तेजीत, गुंतवणूकदार मालामाल

2 hours ago 1

महाराष्ट्रातील भाजप- महायुतीच्या विजयानंतर आज सोमवारी (दि. २५) भारतीय शेअर बाजाराने जोरदार सलामी दिली. (file photo)

पुढारी वृत्तसेवा

Published on

25 Nov 2024, 10:27 am

Updated on

25 Nov 2024, 10:27 am

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील भाजप- महायुतीच्या विजयानंतर आज सोमवारी (दि. २५) भारतीय शेअर बाजाराने जोरदार सलामी दिली. आजच्या ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्सने सुमारे १,३०० अंकांनी वाढून ८०,४७३ च्या अंकाला स्पर्श केला. तर निफ्टी ५० निर्देशांक ४१३ अंकांनी वाढला. सुरुवातीची सेन्सेक्स- निफ्टीची ही वाढ अनुक्रमे १.६ टक्के आणि १.७ टक्के एवढी होती. त्यानंतर सेन्सेक्स ९९२ अंकांच्या वाढीसह ८०,१०९ वर बंद झाला. तर निफ्टी ३१४ अंकांच्या वाढीसह २४,२२१ वर स्थिरावला.

निफ्टी पीएसयू बँक ४ टक्के वाढला. निफ्टी बँक २ टक्के, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस निर्देशांकात १.८ टक्के वाढ दिसून आली. बीएसई मिडकॅप १.६ टक्के तर स्मॉलकॅप १.८ टक्के वाढला.

आज सर्वच क्षेत्रांतून खरेदी दिसून आली. विशेष म्हणजे गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्स सुमारे ३ हजार अंकांनी वाढला आहे. गेल्या शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स २ हजार अंकांनी वाढला होता. आज पुन्हा आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्सने तेजी कायम राखली. यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले.

गुंतवणूकदारांच्या आशावादामुळे बाजारात तेजीत

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजप- महायुतीने २३० जागांवर विजय मिळवला. यात भाजपला १३२, शिंदे शिवसेना ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीला (MVA) केवळ ४६ जागा मिळाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेला २०, काँग्रेस १६ आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाला १० जागांवर समाधान मानावे लागले. महायुतीच्या विजयानंतर गुंतवणूकदारांच्या आशावादामुळे निफ्टी, सेन्सेक्समध्ये वाढ झाली असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Sensex Today : कोणते शेअर्स टॉप गेनर्स?

आज सेन्सेक्सवर एलटीचा शेअर्स टॉप गेनर ठरला. हा शेअर्स ४ टक्के वाढला. त्याचबरोबर एसबीआय, अदानी पोर्ट्स, रिलायन्स, पॉवर ग्रिड, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टीसीएस, कोटक बँक, ॲक्सिस बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एम अँड एम हे शेअर्स १ ते ३.५ टक्क्यांपर्यंत वाढले. तर जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा, इन्फोसिस, मारुती या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article