देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार. File Photo
Published on
:
25 Nov 2024, 12:31 pm
Updated on
:
25 Nov 2024, 12:31 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांच्या नावाच्या प्रस्तावाला एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही मान्यता दिली आहे, असे वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'ने दिले आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीला अनुक्रमे १२ आणि १० मंत्रिपदे मिळण्याची शक्यता असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब?
भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या प्रस्तावाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही मान्यता दिल्याची माहिती भाजपमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री असतील. दरम्यान, शिवसेनेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, “फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याबाबत आमच्याशी कोणताही सल्लामसलत झालेली नाही. आमच्या पक्षात अद्याप मुख्यमंत्र्यांच्या नावावर एकमत झालेले नाही."
भाजप २१ मंत्रीपदे स्वत:कडे ठेवण्याची शक्यता
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद कायम राहील, असा विश्वास आहे. मात्र त्यांना अजित पवारांसह उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागणार आहे. शिवसेनेला सुमारे 12 मंत्रीपदे मिळतील.त्यांना काही महत्त्वाची खाती दिली जातील. राष्ट्रवादीलाही सुमारे १० मंत्रिपदे मिळतील. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातची कमाल मर्यादा ४३ आहे.१३२ आमदार असलेले भाजप २१ मंत्रीपदे स्वत:कडे ठेवण्याची शक्यता आहे. यामध्ये गृह, वित्त, नागरी विकास आणि महसूल ही चार प्रमुख खाती भघजप स्वत:कडे ठेवण्यासाठी उत्सुक आहे. मात्र मंत्रीपद आणि खात्यांच्या संख्येवर काही शेवटच्या क्षणी वाटाघाटी अजूनही सुरू राहणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सायंकाळी दिल्लीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमवेत सत्तावाटपाचा तपशील आणि मंत्रिमंडळ रचना यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्रीपदी कोण होणार याची अधिकृत घोषणा हेणार आहे.