परभणीतील सेलू तालुक्यातील घटना
परभणी/सेलू (Selu termination Case) : शहरातील फुले नगर मधील एका ३३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी पत्राच्या अँगलला मफलरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार २५नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील फुलेनगर परिसरात राहत असलेल्या सचिन रावसाहेब मुकने वय ३३ वर्षे या तरुणाने राहत्या घरी पत्राच्या अँगलला असलेल्या लोखंडी रॉडला मफलरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार २५ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता उघडकीस आली.
मयत सचिन मुकने यास परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात त्यास असलेल्या आजारामुळे गोळ्या सुरू होत्या. यामुळे नेहमीच तो घरी एकटा असायचा आज सचिन मुकणे घरी एकटाच असल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या (Selu termination Case) घटनाची माहिती पोलीसांना कळतात त्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन कोंडावार यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले. (Selu termination Case) मयताचे वडील रावसाहेब त्रंबक मुकने यांनी पोलीसात दिलेल्या खबरे वरून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत. मयत सचिन मुकने यांच्या पश्चात एक मुलगा, आई,वडील ,एक भाऊ विवाहित बहीण असा परिवार आहे.