Published on
:
25 Nov 2024, 4:17 pm
Updated on
:
25 Nov 2024, 4:17 pm
जामखेड: शहाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर असा मिश्कील टोला आमदार रोहित पवार यांना अजित पवार यांनी मारलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओ मुळे राम शिंदे हे व्यथित झाले आहे. राम शिंदे यांनी कर्जत – जामखेड मध्ये मला पाडण्यासाठी माझ्या विरोधात अजित पवार यांनी कट रचला, त्याचा मी बळी झालो असा आरोप केला आहे.
२५ नोव्हेंबर रोजी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी प्रीतीसंगम या समाधीस्थळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे आले होते. त्यानंतर काही वेळातच तिथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे देखील आले होते.
काका पुतण्याच्या या भेटीवेळी अजित पवार यांनी रोहित पवार मिश्कील टिपणी केली. रोहित पवार यांचे आमदार पदी निवडून आल्याबद्दल अभिनंदन देखील करण्यात आले. यावेळी अजित पवार म्हणाले काकांचे दर्शन घे म्हणताच रोहित पवार यांनी देखील वाकून दर्शन घेतले. यावेळेस अजित पवार म्हणले की रोहित थोडक्या मतांनी विजय झाला आहेस, शहाण्या थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर काय झालं असत अस म्हणत आमदार रोहित पवार यांना चिमटा काढला.
आमदार रोहित पवार बोलताना म्हणाले कि, मोठ्यांच्या पाया पडणे ही भारतीय संस्कृती आहे त्यामुळे मी अजित पवार यांचे वाकून दर्शन घेतले आहे. सन २०१९ च्या निवडणुकीत मला अजित पवार यांची निवडणून आणण्यासाठी महत्वाची भूमिका होती. या भेटीमुळे कर्जत जामखेड मतदारसंघात जोरदार चर्चा सुरु झाली. अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात अंधारातून एकत्र असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.
काका पुतण्याच्या भेटीचे राम शिंदे ना खटकले त्यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले कर्जत जामखेड मतदारसंघात मला पाडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कट केला असल्याचे आरोप आ राम शिंदे केला आहे. अजित पवार यांनी महायुती धर्म पाळला गेला नसल्याचा देखील आरोप शिंदे केला आहे. याबाबत पक्ष श्रेष्ठींकडे देखील मी तक्रार केली असल्याचे त्यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. त्यामुळे कर्जत जामखेड चे राजकीय वातावरण महारष्ट्रात पेटले आहे.