राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील पार्डी(मक्ता) वरील प्रकार
डोंगरकडा (National Highway) : (जिल्हा हिंगोली) राष्ट्रीय महामार्गाचे नियम-अटी सर्वच बाजूला ठेवून नांदेड-वारंगा फाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील पार्डी (मक्ता) येथील टोल प्लाझा २५ नोव्हेंबर रोजी सकाळ पासून सुरू झाला असल्याने अनेकजण हैराण झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३६१ वरील वारंगा फाटा ते लोहा चे काम मिळालेल्या कंपनीने सदरील महामार्गाचे काम अतिशय संथगतीने आणि बर्याच ठिकाणी नियम बाह्य कुठे पूर्ण तर कित्येक ठिकाणी अर्धवट कामे, वृक्ष लागवडीच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष, (National Highway) महामार्गावरील स्वच्छताकडे दुर्लक्ष असे असतांना सदरील महामार्गाचे टोल प्लाझा ३ ऑक्टोंबर रोजी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन २५ नोव्हेंबर रोजी सकाळी सुरू करण्यात आला आहे. टोल प्लाझाच्या नावाखाली जनतेची लूट सुरू केली आहे. याकडे राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने गांभीर्याने लक्ष घालून राहिलेली अर्धवट कामे आणि टोल प्लाझा पासून २० कि मी अंतरावरील गावांना यातून सूट देण्याची मागणी जोर धरत आहेत.