– आ. मुटकुळेंनी हॅट्रीक केल्याने दिल्या विशेष शुभेच्छा
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक
हिंगोली (Devendra Fadnavis) : विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच सुरू असताना पक्षश्रेष्ठींनी आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांच्यावर विश्वास दर्शवून त्यांना उमेदवारी बहाल केली. झालेल्या निवडणुकीत आ.तान्हाजी मुटकुळे यांनी विजय संपादन करून हॅट्रीक केल्याने मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांचा विशेष सत्कार केला.
हिंगोली विधानसभा मतदार संघात भाजपतर्फे उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच झाली. त्यामुळे कोणाला पक्षश्रेष्ठी उमेदवारी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जशी जशी निवडणूक जवळ आली तशी तशी उमेदवारीबद्दल उत्कंठा निर्माण झाली होती. अखेर पक्षश्रेष्ठींनी आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांच्या कामाकडे पाहून त्यांना उमेदवारी बहाल केली. त्यानंतर आ.तान्हाजी मुटकुळे यांच्यासह भाजपा व महायुतीच्या पदाधिकार्यांनी अहोरात्र प्रचाराची धुरा सांभाळून प्रचार केल्याने आ. तान्हाजी मुटकुळे यांचा निवडणुकीत विजय झाला आहे. २४ नोव्हेंबर रोजी आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) हे मुंबईत गेल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांचा विशेष सत्कार केला. तसेच आ. मुटकुळे यांनी हॅट्रीक केल्याने त्यांचे कौतुक केले. यावेळी आ.मुटकुळेंसमवेत माजी आ.रामराव वडकुते, मराठवाडा उद्योग आघाडीचे संयोजक संजय कावडे हे सुद्धा उपस्थित होते.
विजयानंतर आ.मुटकुळे मुंबईत दाखल
हिंगोली विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार रूपाली पाटील गोरेगावकर यांचा पराभव केला. आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या विजयाबद्दल मतदार संघात मोठा जल्लोष करण्यात आला. ठिकठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. महायुतीच्या सत्तेत आता मंत्रीमंडळ गठीत होणार असल्याने आ.तान्हाजी मुटकुळे हे २४ नोव्हेंबर रोजी मुंबईत दाखल झाले आहेत.