हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांचा सन्मान:75 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डॉपलर रडर विषयाच्या अभ्यासक्रमात यश
2 hours ago
1
प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर | ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वयाच्या ७५ वर्षी सॅटलाईट मेटिरॉलॉजी, डॉपलर रडार या विषयाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम यशस्वीरित्य पूर्ण केला आहे. याबद्दल त्यांना प्रशिस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. या अभ्याक्रमामुळे त्यांना हवामानाचा अचुक अंदज वर्तवण्यासाठी उपयोग होणार आहे. साऊथ असिया मेटिरॉलॉजीकल असोसिएशन(सामा) व ॲडव्हॉन्स सेंटर फॉर ॲटमॉस्पेरिक रिसर्च कोचीन, सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने २५ मे ते २३ नोव्हेंबर दरम्यान सॅटलाईट मेटिरॉलॉजी विषयाच्या अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ४७ देशातील १९० शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला. यामध्ये महाराष्ट्रातून डॉ. रामचंद्र साबळे यांचा समावेश होता. विशेष म्हणजे त्यांनी हा अभ्याक्रम वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी पूर्ण केला आहे. यामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी होणार फायदा आंतरराष्ट्रीय दर्जावर झालेल्या डॉपलर रडार विषयावर एक्स्पर्ट हवामान तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या अभ्यासक्रमामुळे त्यांना हवामानातील अनपेक्षित बदल टिपणे व सुक्ष्म निरीक्षण करून अचुक अंदाज वर्तवण्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याची माहिती डॉ. साबळे यांनी दिली. २०२५ वर्षापर्यंत डॉपलर रडार बसवले जाणार देशात ३७ ठिकाणीच डॉपलर रडार तंत्रज्ञान बसवलेले आहेत. त्यात २०२५ पर्यंत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा देखील समावेश आहे. डॉपलर रडार कार्यान्वित झाले तर पाऊस, थंडी, तापमान, वादळ, विजा, आदींचा अगोदर अचुक अंदाज वर्तवणे शक्य होईल.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)