Published on
:
25 Nov 2024, 10:27 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील संभल (Sambhal Violence ) येथे रविवारी झालेल्या हिंसाचार ४ लोकांचा बळी गेला आहे. संभल येथील शाही जामा मशिदचे सर्वेक्षण करण्यासाठी विरोध झाल्याने हा हिंसाचार झाला. स्थानिक न्यायालयाने हा मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी वकिली आयोगाची स्थापना केली आहे. आयोगाचे सदस्य १९ नोव्हेंबरला संभलमध्ये आले आहेत, तेव्हापासून या परिसरात तणाव आहे.
शाही जामा मशिद ही १६ व्या शतकात बांधण्यात आलेली आहे. ही मशिदी बांधताना मंदिर पाडून बांधण्यात आल्याचा दावा हिंदू पक्षाने न्यायालयात केला आहे. या खटल्यात न्यायालयाने मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
Sambhal Violence | वादाची पार्श्वभूमी
सर्वोच्च न्यायालयातील वकील विष्णू शंकर जैन यांनी स्थानिक न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. त्याचा दावा आहे की शाही जामा मशिदी ही हरिहर मंदिराच्या जागेवर उभी आहे. हे मंदिर मुघल बादशाह बाबरने १५२९ला पाडले होते, असे जैन यांचे म्हणणे आहे. ही जागा आत पुरातत्त्व विभागाने ताब्यात घ्यावी, अशी मागणी जैन यांनी केली आहे. दिवानी न्यायालयाने वकिली आयोगाची नेमणूक करून सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. काही दिवसांपूर्वी पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षण शांतेत पूर्ण करण्यात आले. पण दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणाला मात्र विरोध झाला, त्यातून हिंसा भडकली. (Sambhal Violence)
हिंदू पक्षाचा दावा काय आहे?
स्थानिक वकील गोपल शर्मा हिंदू पक्षाची बाजू मांडतात. ते म्हणाले, "कालकी अवतार संभल येथे होईल, अशी मान्यता आहे. बाबरचे आत्मचरित्र बाबरनामा आणि अबूल फजल याच्या ऐन ए अकबरीमध्ये या ठिकाणी हरिहर मंदिर असल्याचे संदर्भ आहेत. हे मंदिर १५२९ला बाबरने पाडले."
१८७५च्या ब्रिटिश पुरात्त्व विभागाच्या अहवालात या मशिदीचे आतील आणि बाहेरील स्तंभ हिंदू मंदिरांसारखे आहेत, असे नमूद केले असल्याचे शर्मा यांनी सांगितले. ही मशिद बाबरचा सरदार मिर हिंदू बेग याने बांधल्याचे त्यांनी सांगितले.
मुस्लिम पक्षाची बाजू काय?
समाजवादी पक्षाचे खासदार झिया उर रहमान बर्क यांच्यावर हिंसाचाराचा आरोप आहेत. ते म्हणाले, "संबलमधील जामा मशिद ऐतिहासिक वास्तू आहे. १९९१च्या कायद्यानुसार देशातील धार्मिक स्थळांची स्थिती १९४७ला होती तशी जैसे थे ठेवायची आहे."