सासऱ्याचा रेल्वे स्थानकावर खून, आमदार होत 35 वर्षांनी सूनेनं घेतला राजकीय बदला

2 hours ago 1

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपचे सर्वाधिक उमेदवार राज्यात निवडून आले आहेत. त्यापैकीच एक भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या स्नेहा पंडित दुबे यांनी देखील वसईत कमळ फुलवून इतिहास रचला आहे. वसईची जागा भाजपने प्रथमच जिंकली आहे. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे (BVA) प्रमुख नेते आणि पाच वेळा आमदार हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केलाय. विजय मिळवल्यानंतर स्नेहा दुबे यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

1990 मध्ये वसईतून हितेंद्र ठाकूर यांनी पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र यंदा तिरंगी लढतीत स्नेहा पंडित दुबे यांना हिंतेद्र ठाकूर यांचा पराभव केला आहे. स्नेहा पंडित दुबे यांना 77,553 मते मिळाली. हितेंद्र ठाकूर यांचा ३१५३ मतांनी पराभव झाला. ठाकूर यांना 74,400 मते मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार विजय गोविंद पाटील यांना 62,324 मते मिळाली आहेत. स्नेहा पंडित दुबे या विवेक पंडित यांची कन्या आहे. 2009 मध्ये वसईतून विवेक पंडित यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. ज्यामध्ये त्यांचा विजय झाला. मात्र, पुढच्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा विवेक पंडित यांचा पराभव केला होता.

35 वर्षांनी बदला

वसईतील स्नेहा पंडित दुबे सध्या चर्चेत आहेत. कारण त्यांनी आपल्या सासऱ्यांच्या हत्येचा राजकीय सूड घेतला आहे. ९ ऑक्टोबर १९८९ रोजी त्यांचे सासरे सुरेश दुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होता. नालासोपारा स्टेशनवर ही हत्या झाली होती. जयेंद्र उर्फ ​​भाई ठाकूर याच्यावर त्यांच्या खुनाचा आरोप होता. प्लॉट घेण्याच्या कारणावरून हा खून झाला. उत्तर भारतातून येऊन वसईत स्थायिक झालेल्या सुरेश दुबे यांनी भाई ठाकूर यांना भूखंड देण्यास नकार दिला होता.

रेल्वे स्थानकावर झालेल्या या हत्येने एकच खळबळ उडाली होती. हायप्रोफाईल प्रकरणात राजकीय ताकद वापरली गेली. केस चालू असताना रिव्हॉल्व्हरही बदलण्यात आली आणि इतर पुरावेही नष्ट करण्यात आल्याचा आरोप आहे. पण नंतर सुधाकर सुरडकर ठाणे जिल्ह्यात डीआयजी झाल्यावर भाई ठाकूर आणि इतर गुन्हेगार टाडा अंतर्गत तुरुंगात गेले. त्यांना शिक्षा झाली. भाई ठाकूर सध्या पॅरोलवर आहेत.

हे संपूर्ण प्रकरण विवेक पंडित हाताळत असताना भाई ठाकूर यांचे बंधू हितेंद्र ठाकूर राजकारणात सक्रिय झाले. सलग अनेक विजयानंतर वसईत ठाकूर घराण्याचे वर्चस्व वाढले. 2024 च्या निवडणुकीत वसईत हितेंद्र ठाकूर यांना पराभूत करणे अवघड असल्यातचे म्हटले जात होते. पण पण स्नेहा पंडित दुबे यांनी त्यांना पराभूत केलंय.

राजकारणातील एकदम नवीन उमेदवार असलेल्या स्नेहा पंडित दुबे यांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला. ठाकूर यांना वसई विरार पट्ट्यात डॉन म्हटले जाते. त्यामुळे त्यांचा पराभव त्यांच्या पक्षासाठी मोठा धक्का आहे. कारण त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर यांचा ही नालासोपारा मधून भाजप नेते राजन नाईक यांच्याकडून पराभव झाला आहे. नालासोपारा येथून क्षितिज ठाकूर चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article