पर्लकोटा नदीवरील पुलाजवळ स्फोटके प्रकरण:फरार आरोपीला आरेवाडा रोडवर अटक

2 hours ago 1
पर्लकोटा नदीवरील पुलाजवळ स्फोटके पेरुन ठेवण्यात आलेल्या गुन्ह्रात फरार आरोपीला अटक प्रतिनिधी | नागपूर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवू अशी घोषणा केल्यानंतर गडचिरोलीतील पर्लकोटा नदीवरील पूल उडवून देण्याचा माओवाद्यांचा कट पोलिसांनी १६ नोव्हेंबरला उधळला होता. विशेष म्हणजे रविवार, १७ नोव्हेंबर रोजी अमित शाह प्रचारसभेसाठी गडचिरोलीत येणार होते. या कटातील पाहिजे असलेल्या आरोपीला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. माओवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानंाना नुकसान पोहचविण्याचा उद्देशाने भामरागड आणि ताडगावला जोडणा­या पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके पेरून ठेवली होती. १६ नोव्हेंबरला बिडीडीएस पथकाच्या सहाय्याने सदर स्फोटकांचा शोध घेऊन पुरुन ठेवलेली स्फोटके घटनास्थळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट करण्यात आली. या घटनेमध्ये सक्रिय सहभाग असलेला आरोपी आरोपी पांडु कोमटी मट्टामी (वय ३५, रा. पोयारकोटी, तहसिल भामरागड) याला गडचिरोली पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्या शोध घेण्यासाठी गुप्तहेर यंत्रणा सक्रिय करण्यात आली. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांना विश्वसनीय सुत्रांकडून गुन्ह्रात प्रत्यक्ष सहभाग असलेला आरोपी पांडु कोमटी मट्टामी हा भामरागड जंगल परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्याला पोलिस उपनिरीक्षक संकेत नानोटी यांच्या नेतृत्वातील टिमने भामरागड पोलिस ठाण्याच्या परिसरात आरेवाडा रोडवर नाकाबंदी करीता अटक केली. नाकाबंदी दरम्यान संशयीतरित्या वावरत असतांना पांडु कोमटी मट्टामीला ताब्यात घेऊन अधिक सखोल चौकशी केली असता त्याने आपण पांडु कोमटी मट्टामी असल्याचे सांगितले. पर्लकोटा नदीवरील पुलाजवळ १ क्लेमोर व २ स्फोटके लावली असल्याचे सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article