राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात काय घडतंय? चक्क दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला

2 hours ago 1

महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रचंड घडामोडी घडत आहेत. राज्यात निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता महायुतीचं सरकार राज्यात स्थापन होणार आहे. नव्या सरकारच्या स्थापनेसाठी उद्या रात्री 12 वाजेपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे कदाचित उद्या नव्या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडण्याची शक्यता आहे. पण तरीही राज्यात मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचा सस्पेन्स आहे. राज्यात भाजपला सर्वाधिक 132 जागांवर भाजपला यश आलेलं आहे. त्यामुळे भाजप मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. पण भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत धक्कातंत्राचा अवलंब करुन नव्या चेहऱ्याचं नाव समोर केलं किंवा एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी दिली तर नवा इतिहास रचला जाणार आहे. सर्वाधिक जागांवर यश मिळवल्याने याबाबतचा निर्णय घेण्याचा सर्वाधिक अधिकार भाजपला आहेत. महायुतीच्या दिग्गजांची आज दिल्लीत भाजपच्या हायकमांडशी चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्री कोण होणार? हे ठरणार असल्याची चर्चा आहे.

एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरु असताना मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील हे आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले. याबाबत त्यांनी स्वत: तशी माहिती दिली. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्या मनात नेमकं काय आहे? किंवा दोन्ही राष्ट्रवादींमध्ये काही वेगळं घडतंय का? असाही प्रश्न उपस्थित होतोय. अर्थात याबाबतच्या काही घडामोडी आगामी काळात घडतील तर ते स्पष्ट होईलच. दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी दोन वाक्यात उत्तरे दिली आहेत.

दिलीप वळसे पाटील काय म्हणाले?

दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगावात निवडणूक लढवली. शरद पवार गटाचे देवदत्त निकम विरुद्ध वळसे पाटील यांच्यात लढत झाली. वळसे पाटील यांचा प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव आहे. पण तरीही देवदत्त निकम यांनी त्यांना टफ फाईट दिली. कारण त्यांच्यामागे शरद पवार यांचं पाठबळ होतं. शरद पवारांनी आंबेगावात सभादेखील घेतली होती. यामुळे मतमोजणीच्या शेवटच्या घटकेपर्यंत सस्पेन्स राहीलाय. अखेर अटीतटीच्या या लढतीत दिलीप वळसे पटील यांचा निसटता विजय झाला. ते अवघ्या हजार मतांनी विजयी झाले.

हे सुद्धा वाचा

या विजयानंतर दिलीप वळसे पाटील आज शरद पवारांच्या भेटीला आले. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी फार बोलणं टाळलं. पण त्यांनी चार वाक्यात प्रतिक्रिया नक्की दिली. “इथे मी पवार साहेबांची (शरद पवार यांची) भेट घेणार आहे. काही नाही, फक्त नमस्कार करणार. राजकीय चर्चा नाही. फक्त प्रतिष्ठानची बैठक आहे. त्या बैठकीसाठी मी आलो आहे”, असं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article