नवी दिल्ली (IPL 2025 Mega Auction) : यावेळी आयपीएलमधील खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव होत आहे. फ्रँचायझी प्रत्येक खेळाडूवर 15 ते 25 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक खर्च करत आहेत. यावेळी (IPL 2025 Mega Auction) आयपीएलमध्ये टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज (Rishabh Pant) ऋषभ पंतने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
आयपीएलच्या इतिहासात त्याच्यावर सर्वाधिक रकमेचा वर्षाव झाला आहे. ज्या प्रकारे खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडला, त्यामुळेच आयपीएल ही जगातील सर्वात महागडी लीग ठरली आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने एकट्या ऋषभ पंतवर 27 कोटी रुपये खर्च केले आहेत. अशा परिस्थितीत (IPL 2025 Mega Auction) आयपीएल फ्रँचायझींमध्ये पंतची लोकप्रियता किती आहे, याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो.
ऋषभ पंतने मोडले सर्व विक्रम
ऋषभ पंतनंतर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पंजाब किंग्ज संघाने त्याच्यावर 26.75 कोटी रुपये खर्च केले आहेत. चांगली गोष्ट म्हणजे, यावेळी आयपीएलमध्ये सर्व फ्रँचायझी भारतीय खेळाडूंवर सट्टा लावत आहेत आणि त्यांच्यावर खुलेआम पैसा खर्च करत आहेत.
ऋषभ पंत-श्रेयस अय्यरचा संघ बदल
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) हे दोघेही गेल्या (IPL 2025 Mega Auction) आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांचा भाग होते. परंतु यावेळी हे दोन्ही खेळाडू नवीन फ्रँचायझीसोबत खेळताना दिसणार आहेत. पंत लखनौ संघाकडून खेळताना दिसणार आहे, तर श्रेयस अय्यर पंजाब किंग्ज संघाकडून खेळताना दिसणार आहे. यापूर्वी ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता, मात्र यावेळी तो लखनऊ संघाकडून खेळताना दिसणार आहे.
श्रेयस अय्यरसह लिलावाची सुरुवात धमाकेदार
आयपीएल लिलावात (IPL 2025 Mega Auction) ज्या खेळाडूवर फ्रँचायझींनी बोली लावली, तो पहिला खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) होता. श्रेयस अय्यरला पंजाब संघाने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले, त्यानंतर तो काही काळासाठी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. पण काही काळानंतर (Rishabh Pant) पंतची बोली सुरू झाल्यावर त्याने अय्यरला मागे टाकले आणि तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. श्रेयस अय्यर पंजाब संघाचे नेतृत्व करेल तर पंत लखनौ संघाचे नेतृत्व करणार असल्याचे मानले जात आहे.
व्यंकटेश अय्यरची जादू
यावेळी व्यंकटेश अय्यर आयपीएल लिलावात (IPL 2025 Mega Auction) तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. केकेआर संघाने त्याला 23.75 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्याची मूळ किंमत फक्त 2 कोटी रुपये होती, मात्र त्याला KKR ने 23.75 कोटी रुपयांच्या विक्रमी किंमतीत विकत घेतले.
तीन खेळाडूंवर 77.5 कोटी रुपये खर्च
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि ऋषभ पंतची (Rishabh Pant) मूळ किंमत फक्त 2 कोटी रुपये होती. या (IPL 2025 Mega Auction) तीन खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर या तीन खेळाडूंवर एकूण 77.5 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
आयपीएलमध्ये 20 कोटींहून अधिक किमतीचे खेळाडू:
ऋषभ पंत
मूळ किंमत – 2 कोटी
किंमत किती – 27 कोटीं
टीम- लखनौ सुपर जायंट्स
श्रेयस अय्यर
मूळ किंमत – 2 कोटी
किंमत किती – 26.75 कोटी
संघ- पंजाब किंग्ज
व्यंकटेश अय्यर
मूळ किंमत – 2 कोटी
किंमत किती – 23.75 कोटी
संघ- केकेआर